ऑफिसला जाणाऱ्यांनी आजच स्वतःला लावा 'या' सवयी

Healthy Office Habits: आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होण्यासाठी काही चांगल्या सवयी फॉलो करणे गरजेचे आहे.

Sep 27, 2024, 16:35 PM IST
1/6

चांगल्या सवयी फॉलो करणे

ऑफिसच्या कामाच्या प्रेशरमुळे आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. या दुर्लक्षामुळे आपले आरोग्य आणि काम या दोन्हींवर गंभीर परिणाम होतो. अशामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होण्यासाठी काही चांगल्या सवयी फॉलो करणे गरजेचे आहे.   

2/6

व्यायाम करणे

आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. दररोजच्या दिनचर्येत  किमान ३० मिनिटे व्यायाम करा. हे तुम्हाला तणाव कमी करण्यास, एनर्जी वाढवण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करेल.

3/6

हेल्दी डाएट

हेल्दी डाएट आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी आवश्यक असते. आपल्या रोजच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने समावेश करा. यासोबतच भरपूर पाणी प्या.

4/6

स्ट्रेस मॅनेजमेंट

कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येणं हे फारच सामान्य आहे, परंतु त्याचे मॅनेजमेंट करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी, दीर्घ श्वास, ध्यान, योग किंवा संगीत ऐकणे यासारख्या गोष्टींचा सराव करा.

5/6

चांगली झोप

तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फक्त झोपच नाही तर चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. दररोज रात्री किमान ८-९ तासांची झोप घ्या. झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिणे टाळा. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वापर कमी करा. 

6/6

नियमित आरोग्य तपासणी

नियमित आरोग्य तपासणी तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास मदत करते. एका वेळानंतर रेगुलर  डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. या तपासणीमुळे तुम्हाला काही आजार असल्यास त्यांचे उपचार शक्य तितक्या लवकर सुरू करता येतील. (All Photo Credit: Pixabay, Freepik)