संध्याकाळी भूक लागतेय? मग करा 'हा' हेल्दी नाश्ता...

बऱ्याच जणांना संध्याकाळी खूप भूक लागते. अशा वेळेस नक्की काय खावं आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊयात...   

May 19, 2024, 18:41 PM IST

ऑफिसवरुन घरी आल्यावर किंवा मग तुमची मुलं शाळेतून संध्याकाळी घरी आल्यावर काय खायला द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो. 

1/7

बऱ्याचदा ऑफिसवरुन घरी आल्यावर किचनमध्ये जाऊन काही बनवून खायची ईच्छा होत नाही. अशा वेळेस चहा बिस्कीट आणि चिवडा खाणं नाहीतर फास्टफूड किंवा तळलेले मसालेदार पदार्थ ऑनलाईन ऑर्डर केले जातात. 

2/7

असं असलं तरी फास्टफूडने फक्त पोट भरतं मात्र संध्याकाळच्या वेळी चमचमीत खाण्याने आरोग्यावर परिणाम होतात.   

3/7

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी फास्टफूड खाल्याने याचे वाईट परिणाम शरीरावर दिसून येतात. संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही वडापाव, समोसा चायनिज यासारखे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्याने अ‍ॅसिडीटीचं प्रमाण वाढतं. 

4/7

बदाम आणि केळी

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यावर तुम्ही मुठभर बदाम खाऊ शकता. केळ्याला पूर्ण अन्न म्हटलं जातं. संध्याकाळी एक केळं खाल्याने पोट भरतं.

5/7

पिनट बटर

संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही पिनट बटर देखील खाऊ शकता.पिनट बटरमध्ये प्रोटीन भरुपूर प्रमाणात असतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी देखील पिनट बटर फायदेशीर ठरतं.   

6/7

मखाने

तुम्ही संध्याकाळी भूक लागल्यावर मखाने देखील खाऊ शकता. पचनसंस्था सुधारण्यासाठी मखाने खाणं फायदेशीर ठरतं. मखाने खाल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 

7/7

अ‍ॅप्पल स्मूदी

अ‍ॅप्पल  स्मूदीमध्ये सफरचंद,दूध आणि सब्जाचा समावेश केला जातो. त्यामुळे शरीराला अँटी-ऑक्सीडेंट आणि फायबर मोठ्या मुबलक प्रमाणात मिळतात. सब्जामुळे खूप वेळ पोट भरलेलं राहतं. त्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळी हेल्दी नाश्ता करायचा असल्यास अ‍ॅप्पल स्मूदीचा समावेश करु शकता.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)