Microwave Side Effects : मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? मग ही बातमी वाचायलाच हवी सावधान! मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय?

Microwave Side Effects : मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आज आम्ही तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्याचे काय तोटे आहेत ते सांगणार आहोत.

Jul 27, 2022, 20:48 PM IST

Microwave Side Effects : बर्‍याच वेळा असं दिसून येतं की लोकांना थंड अन्न खाण्यासाठी आवडत नाही म्हणून ते मायक्रोवेव्ह वापरतात. मायक्रोवेव्हमध्ये अन्न लवकर गरम होतं आणि वेळही वाचतो. पण मायक्रोवेव्ह जास्त वेळ वापरल्यानेही नुकसान होतं. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आज आम्ही तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्याचे काय तोटे आहेत ते सांगणार आहोत.

1/5

कर्करोगाचा धोका वाढतो

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील आवश्यक मिनरल्स फ्री रॅडिकल्समध्ये बदलतात ज्यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये भाज्या गरम करणं टाळावं असा सल्ला दिला जातो. यामुळे इतर अनेक आजारांचा धोकाही टळतो.

2/5

अन्नातील पोषक घटक कमी होतात

असं मानलं जातं की मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने त्यातील जीवनसत्त्वे आणि मिनरल्स  यांसारखे पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच आरोग्य तज्ञ मायक्रोवेव्हचा वापर कमी करण्याची शिफारस करतात.

3/5

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने रक्तातील सीरम पातळी आणि लिम्फ ग्रंथींवर वाईट परिणाम होतो. हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे सुरळीत कार्य करण्यास मदत करते. त्यांच्या प्रभावामुळे प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

4/5

मानसिक आरोग्यावर परिणाम होतो

मायक्रोवेव्हमध्ये जास्त वेळ अन्न गरम केल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कारण मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले बहुतेक अन्न हार्मोन्सची वाढ मंदावते.

5/5

डिहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नातील पाण्याच्या कणांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अन्न कोरडे होते. त्यामुळे शरीर डिहाइड्रेशनाचे बळी ठरू शकते. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न टाळण्याचा सल्ला देतात.