PHOTO: 'नथीचा सीन शुट झाला अन् मी ओक्साबोक्शी रडलो', हिरामंडीचे 'उस्तादजी' इंद्रेश मलिक यांनी सांगितला किस्सा

Heeramandi Web series : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाजार' सीरिज सध्या जोरदार चर्चेत आहे.

| May 13, 2024, 11:37 AM IST

Heeramandi Web series : हिरामंडीमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल यादेखील प्रमुख भूमिका आहेत.

1/7

हिरामंडी वेबसिरीजमध्ये सर्वांना आवडणारं पात्र ठरलं ते उस्तादजी यांचं... अभिनेते इंद्रेश मलिक यांनी हे पात्र चोखपणे पार पाडलं.  

2/7

अभिनेते इंद्रेश मलिक यांच्यासाठी हे पात्र साकारणं कठीण होतं. मात्र, त्यांनी ते उत्तमपणे सांभाळलं. अशातच त्यांनी नथीच्या सीनवर किस्सा सांगितला आहे.

3/7

माझ्या व्यक्तिरेखेचा देखावा असं काही मला वाटलं की, कोणीतरी आहे ज्याने मला स्वीकारलंय, ज्याने मला उबदारपणा दिला, अशी जाणीव मला झाली, इंद्रेश मलिक यांनी म्हटलंय.

4/7

'नाथ' धारण करणं म्हणजे आदर मिळवणं. त्या क्षणी जेव्हा सीन झाला तेव्हा मी जवळजवळ पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ रडत होतो, असंही त्यांनी सांगितलं.

5/7

मी शांतपणे रडू शकत नाही, म्हणून मी ओरडलो. मी लहान मुलासारखा ओरडत होतो आणि रडत होतो, एक पिन-ड्रॉप शांतता होती.

6/7

मला रडताना पाहून संजय लिला भंसारी माझ्याकडे आले अन् माझ्या कामाचं कौतूक केलं. देखो, रोता जा रहा है, इतना अच्छा तो किया, असे त्यांचे शब्द होते.

7/7

संजय सरांनी मला मिठी मारली अन् माझ्या प्रेमाचं कौतूक म्हणून मला 500 रुपये दिले. त्यानंतरही मी माझ्या व्यक्तिरेखेचा विचार करत होतो, असंही इंद्रेश मलिक यांनी म्हटलं आहे.