महाराष्ट्रात हिपॅटायटीसचे वाढते रुग्ण; पावसाळ्यात 'हे' उपाय महत्त्वाचे, धोका होईल कमी
हिपॅटायटीस हा लिवरशी संबंधीत एक गंभीर आजार आहे. पावसाळ्यात याचा धोका अधिक वाढतो. महाराष्ट्रात हिपॅटायटीसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अशावेळी जगभरात या आजाराबाबत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने जागतिक हिपॅटायटिस हा दिवस 28 जुलै रोजी साजरा केला जातो.
राज्यात दररोज सरासरी 3 जणांना हिपॅटायटीस बी किंवा सीची लागण होते. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, नॅशनल व्हायरल हेपेटायटीस कंट्रोल प्रोग्राम (NVHCP) अंतर्गत, गेल्या 4.4 वर्षांत एकूण4962 लोकांना B आणि C ची लागण झाली आहे. दुसरीकडे, चांगली गोष्ट म्हणजे या सर्व लोकांवर मोफत उपचार केले जात आहेत.