विजयानंतर प्लेअर्सकडून Insta Stories चा पाऊस; कॅप्टन सूर्या गंभीरला म्हणाला, 'जिंदगीभर की...'

Suryakumar Yadav Instagram Story On Gautam Gambhir: भारतीय संघाचं पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवसाठी हा पहिलाच टी-20 अंतरराष्ट्रीय सामना होता. तर गंभीरसाठीही प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यानंतर तीन खेळाडूंच्या इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहेत. काय आहे स्टोरीजमध्ये पाहूयात...

| Jul 28, 2024, 13:36 PM IST
1/8

Instagram Story After Win Against SL

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये भारताने 43 धावांनी विजय मिळवला. हा श्रीलंकेतील भारताचा टी-20 मधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. 

2/8

Instagram Story After Win Against SL

श्रीलंकेच्या भूमीवर मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयामध्ये भारताच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. भारताने दिलेलं 214 धावांचं आव्हान श्रीलंकन संघाला पेलवलं नाही.

3/8

Instagram Story After Win Against SL

श्रीलंकेने उत्तम सुरुवात केल्यानंतरही श्रीलंकेची धावसंख्या 149 धावांवर दोन गडी बाद अशी होती. मात्र त्यानंतर श्रीलंकेने 21 धावांमध्ये 8 विकेट्स गमावल्या आणि सामना भारताने जिंकला.   

4/8

Instagram Story After Win Against SL

सूर्यकुमार यादवने या सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कारही पटकावला. त्याने तुफान फलंदाजी करताना 26 बॉलमध्ये 58 धावा केल्या.

5/8

Instagram Story After Win Against SL

भारताने मिळवलेल्या या विजयानंतर सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हार्दिक पंड्या आणि पंतची इन्स्टाग्राम स्टोरीही चर्चेत आहे.  

6/8

Instagram Story After Win Against SL

पंतने स्वत:चा एक षटकार मारतानाचा सामन्यातील फोटो शेअर करत चांगला विजय आम्ही मिळवला अशी कॅप्शन दिली आहे.  

7/8

Instagram Story After Win Against SL

दुसरीकडे हार्दिकने सामना जिंकल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंशी हस्तांदोलन करताना फोटो शेअर केला आहे. मालिकेच्या सुरुवात उत्तम विजयाने झाली अशी कॅप्शन त्याने दिली आहे.

8/8

Instagram Story After Win Against SL

'मान गये भाई लोक यार... जिंदगीभर की यादे दे देते हो...' अशा कॅप्शसहीत गंभीरची मुलाखत शेअर केली आहे.