तयारीला लागा! भारतात 'या' सरकारी नोकऱ्यांना मिळतो लाखोंचा पगार

भविष्यात सरकारी नोकरी करण्याचा विचार करताय तर शिक्षण घेत असताना कोणत्या फिल्डमधून घ्यायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

| Feb 02, 2024, 16:02 PM IST

Highest Paying Government Jobs: भविष्यात सरकारी नोकरी करण्याचा विचार करताय तर शिक्षण घेत असताना कोणत्या फिल्डमधून घ्यायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

1/7

तयारीला लागा! भारतात 'या' सरकारी नोकऱ्यांना मिळतो लाखोंचा पगार

Highest Paying Government Jobs in India Marathi News

Highest Paying Government Jobs: सरकारी नोकरीमध्ये पद, प्रतिष्ठा आणि पगार मिळतो.  त्यामुळे आपल्याला एक चांगल्या पगाराची सरकारी नोकरी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. 

2/7

घरच्यांच्याही इच्छा

Highest Paying Government Jobs in India Marathi News

सरकारी नोकरी मिळावी अशा घरच्यांच्याही अनेक अपेक्षा असतात. नव्या वर्षात तुम्ही अशा नोकऱ्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. 

3/7

दरमहा लाखोंची कमाई

Highest Paying Government Jobs in India Marathi News

पुढे देण्यात आलेल्या नोकऱ्यांच्या माध्यमातूंन तुम्ही दरमहा लाखोंची कमाई करु शकता.  या नोकऱ्या कोणत्या आहेत? तुम्हाला शिक्षण घेत असताना कोणत्या फिल्डमधून घ्यायला हवे? याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

4/7

आयएएस किंवा आएफएस अधिकारी

Highest Paying Government Jobs in India Marathi News

आयएएस किंवा आएफएस अधिकारी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. देशातील लाखो तरुण ग्रॅज्युएशननंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करतात.  प्रिलिम, मुख्य आणि मुलाखत प्रक्रियेत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही या पदापर्यंत पोहोचू शकता. सुरुवातीला तुम्हाला 56 हजार 100 रुपये इतका पगार आणि सरकारी सुविधा मिळेल. हा पगार कालांतराने वाढत जाईल.

5/7

इंजिनीअर, सायटिंस्ट

Highest Paying Government Jobs in India Marathi News

इंजिनीअर, सायटिंस्ट होणं म्हणजे एकदम भारी असं आपल्याकडे मानलं जातं. इस्रोच्या चांद्रयान, आदित्य एल 1 प्रक्षेपणानंतर यांचे महत्व अधिक पटू लागले. DRDO, ISRO मध्ये वर्षभर भरती सुरु असते. येथे नोकरी मिळाल्यास सुरुवातीला 56 हजार100 रुपये पगार मिळेल. अनुभवानुसार हा पगार वाढू शकतो.

6/7

शिक्षक

Highest Paying Government Jobs in India Marathi News

आपल्या आयुष्यात शिक्षकांना विशेष स्थान असते. नेटसेट परीक्षा उत्तीर्ण करुन तुम्ही महाविद्यालय/विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवू शकता. एका शिक्षकाला सुरुवातील किमान 40 हजार रुपये पगार मिळतो. विद्यापीठातील सिनीअर कॉलेजच्या प्राध्यापकांना लाखोंमध्ये पगार मिळतो. हा पगार आणि मिळणाऱ्या सुविधा वेळोवेळी वाढत राहतात.

7/7

30 ते 40 हजार पगार

Highest Paying Government Jobs in India Marathi News

तुम्ही तुमचे शिक्षण आणि अनुभवानुसार न्यायालय, बँकेतील विविध पदे, पीएसयू नोकऱ्या, एसएससीच्या भरतीमध्ये सहभागी होऊ शकता. यामध्ये तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये सुरुवातीला पगार मिळू शकतो.