Holi 2024 : होलिका दहनाचा शुभ मुहर्त? हिंदू धर्मानुसार धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

फाल्गुन मासातील हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होलिका दहन.कोकणपट्टा भागात याला शिमगा असे ही म्हटले जाते. गणेशोत्सवाप्रमाणे शिमग्याला कोकणात मोठा उत्सव साजरा होतो.   

Mar 14, 2024, 18:29 PM IST

भारतीय सण हे ऋतूचक्रावर आधारित आहेत. थंडीचं वाढलेलं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी वसंत ऋतू सुरू होतानाच होळीचं दहन केलं जातं. 

1/7

हुताशनी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व दिले जाते. जे जे वाईट आणि नकारात्मक आहे ते होळीत जाळून टाकावं अशी धारणा आहे.   

2/7

हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे मध्यरात्री केलं जातं.रात्रीच्या अंधारात जीव जंतू आगीच्या प्रकाशाकडे आकर्शित होतात. त्यामुळे ते मरतात.     

3/7

यंदा होळीचा शुभ मुहुर्त हा 24 मार्चला रात्री 11वाजून 20 मिनिटांनी असल्यास सांगितलं जातं. 

4/7

होलिका दहन करताना धूप आणि कापूर  यांचा वापर केला जातो, त्यामुळे वातावरणातील हवा शुद्ध राहण्यास मदत होते.

5/7

असं म्हटलं जातं की, होळीत भाजलेले नारळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

6/7

ज्योतिषशास्त्रानुसार होळीची राख दुसऱ्या दिवशी घराच्या कोपऱ्यात टाकल्याने नकारात्मक शक्ती दूर होते. 

7/7

होलिका दहन हे अग्नी देवतेचं स्वरुप मानलं जातं. अग्नीदेवतेची पुजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.    ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )