Holi Shopping: होळी करिता येणाऱ्या पाहुण्यांचा 'असा' करा पाहुणचार

पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. सणाच्या निमित्ताने का होईना माणसं एकमेकांना भेटतात. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं आणि सजावटीसाठी गृहिणींची लगबग सुरू होते.

Mar 17, 2024, 12:53 PM IST

घराच्या सजावटीसाठी कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करावी हे ,यंदाच्या होळीच्या निमित्ताने जाणून घेऊयात.

 

1/7

धुळवडीचा उत्साह खास करून मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. बाजारात येणारे विविध रंग , वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या यांचा हट्ट् मुलं करतात. लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक असते त्यामुळे होळीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा. 

2/7

सणावाराच्या निमित्ताने माणसं एकमेकांच्या घरी जाऊन भेट देतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला नातेवाईक एकत्र येत धुळवड साजरी करतात.   

3/7

होळीला घरी पाहुण्यांचं येणं जाणं होत असतं, त्यामुळे घर साफ ठेवणं तसचं सणाच्या दिवशी घराची सजावट करणं, आणि खाण्यापिण्याच्याच्या वस्तू खरेदी कराव्या लागतात.   

4/7

घराच्या सजावटीसाठी खरेदी करायची असल्यास बेडशीट, पडदे, सोफा कवर, पेंटींग, फोटो फ्रेम हे घराच्या सजावटीसाठी खरेदी करु शकता. 

5/7

त्याचबरोबर होळीच्या निमित्ताने तुम्ही घराच्या  इंटिरिअरसाठी वॉल हँगिंग आणि आर्टिफिशियल फूलांचा समावेशही करू शकता.   

6/7

अलीकडच्या काळात सणानुसार ट्रेंड सुरू आहेत. त्यामुळे होळीच्या सणाला कपडे, मॅचिंग फुटवेअर आणि ज्वेलरीची शॉपिंग केली जाते. 

7/7

धुळवडीच्या पाहुण्यांची रेलचेल सुरू असते, त्यामुळे कोरडा खाऊ म्हणजे फरसाण, चकल्या लाडू, सुका मेवा, खाकरा किंवा मेथीचे ठेपले ,बाकरवडी अशा कोरड्या खाऊची शॉपिंग तुम्ही करू शकता.