Kitchen Tips : डाळी आणि पिठामध्ये किडे झाले? स्वयंपाकघरातील 'या' टिप्स फॉलो करा

Home Remedies News In Marathi  : स्वयंपाकघरात आपण अनेकदा महिन्याभराचे सामन भरतो. त्यात तांदूळ, गहू आणि अनेत डाळीच्या पिठांचा समावेश असतो. पण कधी कधी महिनाभरात आतच काही सामानाला अर्थातच डाळींच्या पिठांमध्ये अथवा अन्नधान्यांमध्ये कीड लागते. अशावेळी काय करायचं असा प्रश्न पडतो? आता काळजी करायची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील या टिप्स फॉलो करा... 

Jun 19, 2023, 15:29 PM IST
1/7

Kitchen Tips

घरातील रवा, बेसन आणि इतर पदार्थांमध्ये किड लागू नये यासाठी नक्की काय करायचे याचे सोपे उपाय जाणून घ्या...

2/7

पुदिन्याची पाने वापरा

Kitchen Tips

तुम्ही नेहमी स्वयंपाकघरात पुदिन्याची पाने वापरतो. हीच पाने तुम्ही पदार्थांना कीड न लागण्यासाठीही वापरु शकता. पुदिन्याची सुकलेली पाने तुम्ही या पिठांमध्ये अथवा अन्नधान्याच्या डब्यांमध्ये ठेवल्यास, कीड लागत नाही. याचा सुगंध कीड न लागण्यासाठी फायदेशीर ठरतो.  तसेच यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे कडधान्ये आणि पिठ सुरक्षित राहण्यास मदत होते.

3/7

कढईमध्ये भाजून ठेवा

Kitchen Tips

रवा, बेसन अशी काही पिठ असतील तर तुम्ही भाजून ठेवू शकता. बेसन आणि रवा यांसारखे पदार्थ भाजून तुम्हाला ठेवल्यानंतर जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्याशिवाय तुम्हाला पटकन पदार्थ काढल्यानंतर लगेच त्याचा पदार्थ बनवता येतो. वेळही जात नाही. हे पदार्थ अर्धेकच्चे भाजा आणि मग तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवता येतात.   

4/7

रेफ्रिजरेटिंग

Kitchen Tips

जर तुम्हाला मैदा किंवा इतर कोणताही पदार्थ टिकवून ठेवायचा असतील तर तुम्ही पिठा किंवा रवा फ्रिजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे ते बराच काळ टिकून राहू शकते.  तसेच किड लागण्याची ही भीती राहत नाही. तसेच फ्रीजमध्ये वस्तू ताज्या राहतात. रेफ्रिजरेटरमुळे तुम्ही किंवा पदार्थ दीर्घकाळ सुरक्षित राहतात.

5/7

हवाबंद कंटेनर वापरा

Kitchen Tips

पीठ आणि अन्नधान्यावर किड्यांचा वावर होऊ नये यासाठी हे पदार्थ काचेच्या बंद डब्यात अर्थात एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवावेत. हा यावरील चांगला उपाय आहे. काच अथवा मेटलच्या कंटेनर्समध्ये तुम्ही हे पदार्थ ठेवा. याशिवा एखाद्या प्लास्टिकच्या मोठ्या कंटेनर्समध्येही तुम्ही स्वच्छ करुन ठेऊ शकता. 

6/7

तमालपत्र किंवा कडूलिंबाच्या पानाचा वापर करा

Kitchen Tips

किड्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तमालपत्र  हा उत्तम उपाय आहे. तमालपत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या वस्तू किड्यांपासून सुरक्षित ठेवू शकता. तसेच यासाठी कडूलिंबाच्या पानांचाही तुम्ही यासाठी उपयोग करु शकता. मैदा, बेसन, रवा या पदार्थांच्या डब्यात कडूलिंबाची पाने अथवा तमालपत्र टाकून ठेवा. 

7/7

पॅकेजिंग बदला

Kitchen Tips

रवा, बेसनाचे पीठ आणि मैदा यांसारखे पदार्थ जास्त काळ टिकवायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला त्यांचे पॅकेजिंग काढून टाकावे लागेल. मूळ पॅक केलेल्या पिशवीऐवजी तुम्ही एखाद्या डब्यात किंवा दुसऱ्या पिशवीमध्ये हे पदार्थ भरुन ठेवा. पण ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यामध्ये ठेवताय ती जागा सुकी असायला हवी.