कोल्हापूरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना भरली घोडागाडी शर्यत
कोल्हापूरत सोशल डिस्टन्शिंगकडे दुर्लक्ष
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: कोल्हापूरातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत कोल्हापूरात ३६ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. मुंबईतून प्रवास करणाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. असं असताना आज कोल्हापूरात घोडागाडी शर्यत भरवण्यात आली.
पुईखडी इथे घोडागाडी शर्यत भरवण्यात आली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. शर्यत पाहण्यासाठी जमले शेकडोंच्या संख्येत लोक उपस्थित होते. सोशल डिस्टसिंगचा या शर्यतीत तर फज्जाच उडाला.