Lockdown : मुंबईच्या फिल्म स्टुडिओंमध्ये शुकशुकाट

लाईट, कॅमेरा अण्ड ऍक्शन... 

May 17, 2020, 13:59 PM IST

मुंबईत प्रत्येक जण आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. कलाकारांसाठी तर ही त्यांची विश्वनगरी आहे. या विश्वनगरीत असलेले फिल्म स्टुडिओ गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. लाईट, कॅमेरा अण्ड ऍक्शन या शब्दांची ओढ आता या फिल्म स्टुडिओंना लागली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबई बंद आहे. त्यामुळे मुंबईत असलेले फिल्म स्टुडिओ देखील बंद आहेत. फक्त गेटवर सुरक्षा रक्षक असल्याचे चित्र समोर आहे

1/4

दादासाहेब फाळके चित्रनगरी

दादासाहेब फाळके चित्रनगरी

दादासाहेब फाळके चित्रनगरीत अनेक मोठे चित्रपट साकारण्यात आले आहेत. या चित्रनगरीत विनोदवीर कपिल शर्माच्या शोचा देखील सेट आहे. अनेक मालिकांचे शुटींग देखील या चित्रपट नगरीत होत आहे. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी आणि करण जोहरच्या चित्रपटांचे सेट देखील याठिकाणी उभे आहेत. 

2/4

मेहबूब स्टुडिओ

मेहबूब स्टुडिओ

वांद्रेमध्ये असलेल्या या स्टुडिओत अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांचे शुटींग मोठ्या प्रमाणावर होते. कारण स्टुडिओच्या पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचं घर आहे.

3/4

फिल्मीस्तान स्टुडिओ

फिल्मीस्तान स्टुडिओ

फिल्मीस्तान स्टुडिओ गोरेगावमध्ये आहे. या स्टुडिओमध्ये रियालिटी शोचे भलेमोठे सेट उभे आहेत. शिवाय फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये गाण्यांचे शुटींगदेखील होत असते. परंतु लॉकडाऊनमुळे येथील कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. 

4/4

फिल्म आलया स्टुडिओ

फिल्म आलया स्टुडिओ

फिल्म आलया स्टुडिओच्या आसपासच्या परिसरात बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन आणि ऋतिक रोशन यांसारखे कलाकार राहतात. परंतु लॉकडाऊनमुळे फिल्म आलया स्टुडिओला देखील टाळे लागले आहेत.