तुम्हाला आहे गरम चहा आणि कॉफी पिण्याची सवय? आरोग्यावर होतील 'हे' वाईट परिणाम

Disadvantages of drinking hot drinks : भारतातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीनं करतात. तर काही लोक आहेत जे गरम पाणी, ग्रीन टी आणि दूध घेतात. त्यात काही लोक आहेत जे थोडी पण चहा किंवा कॉफी थंड झाली की परत गरम करतात आणि मग पितात. पण अशा प्रकारे तुम्ही देखील चहा किंवा कॉफी घेत असाल तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मग या समस्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया...

| Jul 14, 2023, 18:06 PM IST
1/7

चहा-कॉफीचे अॅडिक्शन

Disadvantages of drinking hot drinks

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीसोबत होते. जर चहा किंवा कॉफी त्यांना मिळाल्या नाही तर त्यांना काय करायचं हेच सुचत नाही. अशात ते चहा किंवा कॉफीला अॅडिक्टेड आहेत असं म्हणायला हरकत नाही. 

2/7

अपचन

Disadvantages of drinking hot drinks

जास्त गरम पेयाचे सेवन केल्यानं तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. जास्त गरम पेयाचे सेवन केल्यानं जळजळ होते. यामुळे ऍसिड रिफ्लक्स, पोट खराब होणे आणि छातीत जळजळ होऊ शकते.

3/7

शरीरातील हीट वाढते

Disadvantages of drinking hot drinks

बाहेरचं वातावरण गरम किंवा आद्र असेल तर त्या परिस्थितीत तुम्ही गरम पेयाचे सेवन केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होते. शरीरातील हीट वाढते आणि अस्वस्थ वाटू लागते. 

4/7

जळजळ

Disadvantages of drinking hot drinks

जास्त गरम चहा, कॉफी किंवा इतर कोणतेही पेय पिल्याने तोंड आणि जीभ जळू शकते. यामुळे घशात जळजळ देखील होऊ शकते. यामुळे तुम्हाला जेवण करताना वगैरे समस्या उद्भवू शकतात. 

5/7

दातांच्या संबंधीत समस्या

Disadvantages of drinking hot drinks

गरम पेये पिल्याने दातांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तुमच्या दातांच्या इनॅमलला नुकसान होऊ शकते.

6/7

तहान लागणे

Disadvantages of drinking hot drinks

जास्त गरम पेये पिण्याचा एक वाईट परिणाम म्हणजे यामुळे तुम्हाला सतत तहान लागते. चहा आणि कॉफीमध्येही कॅफीन असल्याने त्याचा तुमच्या शरीरातील हायड्रेशन लेव्हलवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला खूप तहान लागते 

7/7

Disadvantages of drinking hot drinks

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)