कोरोना पॉझिटिव्ह असूनही कॅमरून ग्रीनला कशी मिळाली खेळण्याची परवानगी; पाहा ICC चा नियम

कॅमेरून ग्रीनला सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तो टेस्ट खेळणार नसल्याचं वाटत होतं. मात्र असे वाटत होते पण ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन घोषणा केली, तेव्हा त्यात त्याचे नाव टीममध्ये होतं.

Jan 26, 2024, 12:13 PM IST
1/7

गाबामध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय.

2/7

या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला कोविड-19 ची लागण झाली होती. मात्र तरीही तो ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये असून मैदानावर खेळताना दिसतोय. 

3/7

ऑस्ट्रेलियन मॅनेमेंटने कॅमेरून ग्रीनला कोविड-19 ची लागण असूनही खेळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोरोना असूनही ग्रीनला खेळण्याची परवानगी कशी मिळाली आणि यासाठी नेमके नियम काय आहेत ते पाहूयात.

4/7

या सामन्यात ग्रीनला आयसीसीने बनवलेले नियम पाळावे लागणार आहेत. त्याला संपूर्ण सामन्यात खेळाडूपासून अंतर राखण्याची काळजी घ्यावी लागेल

5/7

तो फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो, परंतु त्याला चेंडूवर घाम लावता येणार नाही.

6/7

ज्यावेळी चेंडू त्यांच्याकडे जाईल तेव्हा तो सॅनिटाईज केला जाईल.

7/7

त्याचप्रमाणे तो सामन्यादरम्यान कोणत्याही खेळाडूशी हस्तांदोलन करू शकत नाही आणि खेळाडूंकडे जाऊन विकेट घेतल्याचा आनंद साजरा करू शकणार नाही.