पुण्यातील पुरुषांना सर्वाधिक टेन्शन! समोर आली जिल्हानिहाय आकडेवारी; दुसऱ्या क्रमांकावर...

2 कोटी 79 लाख 99 हजार 290 पुरुषांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून. आरोग्य तपासणीसोबत ईसीजी, सिटी स्कॅन, एक्स रे अशा चाचण्या करण्यात आल्या.  

Jan 26, 2024, 10:55 AM IST
1/10

निरोगी तरुणाई, वैभव महाराष्ट्राचे या मोहिमेअंतर्गत राज्यातील 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.   

2/10

2 कोटी 79 लाख 99 हजार 290 पुरुषांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून. आरोग्य तपासणीसोबत ईसीजी, सिटी स्कॅन, एक्स रे अशा चाचण्या करण्यात आल्या.  

3/10

यादरम्यान राज्यातील 38 लाख 7 हजार 356 जणांना उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलं आहे. त्यातील सर्वाधिक पुरुष पुण्यातील आहेत.   

4/10

पुण्यातील रुग्णसंख्या 5 लाख 71 हजार 179 आहे.   

5/10

त्यानंतर नाशिकचा क्रमांक आहे. नाशिकमध्ये 2 लाख 72 हजार 351 जण आढळले आहेत  

6/10

तिसऱ्या क्रमांकावर ठाणे असून उच्च रक्तदाबाचे 2 लाख 28 हजार 419 रुग्ण आढळले आहेत.   

7/10

राज्यात मधुमेहाचे 4 लाख 67 हजार रुग्ण आढळले असून, त्यात सर्वाधिक 37 हजार रुग्ण पुण्यातील आहेत.   

8/10

त्यानंतर कोल्हापूर (36 हजार), अकोला (26 हजार) यांचा क्रमांक आहे.   

9/10

तसंच हृदयविकाराचे 1 लाख 86 हजार रुग्ण आढळले आहेत.   

10/10

तोंडाच्या कर्करोगाचे 74 रुग्ण आढळले आहेत. ओरल सबम्युकस फायब्रोसिसचे 1 हजार 668 रुग्ण असून मोतिबिंदूचे 778 आणि रक्तक्षयाचे 1 हजार 298 रुग्ण आढळले आहेत.