Christmas 2022: जगातील अनेक भागात असा साजरा करतात नाताळ, जाणून घ्या अनोख्या प्रथा

Christmas 2022: डिसेंबर महिना सुरू होताच सर्वांना ख्रिसमसचे वेध लागतात. या सणादिवशी येशू ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा केला जातो. जगभरात ख्रिसमस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही मजेदार आहेत आणि काही भयानक आहेत. ख्रिसमसच्या सणाशी संबंधित हे विचित्र प्रथा जाणून घेऊयात.

Dec 15, 2022, 19:51 PM IST
1/5

Christmas 2022

नॉर्वेमध्ये ख्रिसमसच्या दिवशी लोक त्यांच्या घरात सर्व झाडू लपवतात. ख्रिसमसच्या संध्याकाळी भुतं झाडूवर स्वार होऊन बाहेर पडतात, अशी समज आहे. ज्या घरात भुते झाडू पाहतात, तिथे राहतात अशी समज आहे.

2/5

Christmas 2022

जगभरातील लोक ख्रिसमस ट्री रंगीबेरंगी दिवे आणि खेळण्यांनी सजवतात. पण युक्रेनमधील लोक ख्रिसमस ट्री कोळ्याच्या (Spider) जाळ्यांनी सजवतात. यामागेही एक कथा आहे. एका गरीब स्त्रीकडे ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी काहीही नव्हते, म्हणून तिने कोळ्याच्या जाळ्यांनी सजवले. सूर्यप्रकाश पडताच या जाळ्यांचं सोनं-चांदीत रूपांतर झाले.

3/5

Christmas 2022

ऑस्ट्रियातील लोक ख्रिसमस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी लोक भुताच्या पोशाखात रस्त्यावर येतात. असे मानले जाते की, सेंट निकोलसचा शत्रू क्रॅम्पस हा राक्षस या दिवशी रस्त्यावर दिसणार्‍या मुलांचे अपहरण करतो. म्हणूनच लोक मुलांना भुताचा पेहराव करून घाबरवतात.

4/5

Christmas 2022

पोर्तुगालमध्ये असे मानले जाते की ख्रिसमसच्या दिवशी पूर्वज डिनरसाठी येतात. म्हणूनच लोक जेवणाच्या टेबलावर पूर्वजांसाठी जेवणाचे ताट ठेवतात.

5/5

Christmas 2022

व्हेनेझुएलामध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने लोक रोलर स्केट्सवर चर्चमध्ये जातात. 1960 च्या दशकात सुरू झालेली ही परंपराही लोक साजरी करतात.