Tata कंपनीची Altroz Race कार लाँच, स्पोर्टी लुक, सनरूफ आणि 6 एअरबॅग्ज ! किंमत पाहून लगचे बुकिंग कराल

जाणून घेऊया Tata Altroz Race कारचे बेस्टच फिचर्स.

| Jun 08, 2024, 18:04 PM IST

Tata Altroz Race : टाटा आपली नवी Tata Altroz Race कार लाँच केली आहे. स्पोर्टी लुकसह या कारमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. ही कार बजेट कार आहे. अवघ्या दहा लाखात ही कार खरेदी करता येणार आहे. 

1/7

Hyundai i10 N Line या कारला टक्कर देण्यासाठी टाटा कंपनीने Tata Altroz Race ही करा बाजारात उतरवली आहे.   

2/7

 या कारची स्टार्टिंग प्राईज 9.49 लाख तर टॉप मॉडेलची किंमत 10.99 लाख इतकी आहे.   

3/7

 स्पोर्टीलुकसह या कारमध्ये सनरूफ देखील देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये 6 एअरबॅग्ज देखील देण्यात आल्या आहेत. प्युअर ग्रे, ॲटॉमिक ऑरेंज आणि अव्हेन्यू व्हाईट अशा तीन कलर ऑप्शनमध्ये ही कार मिळते.

4/7

 Altorz Racer कारमध्ये  360-डिग्री कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. 26.05 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट (सेगमेंटमध्ये प्रथमच), इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम (ESC) असे हायटेक फिचर्स देण्यात आले आहेत.    

5/7

या कारमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे पावरफुल इंजिन 120Ps पॉवर आणि 170Nm जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. 

6/7

स्पोर्टी लुक हे या कारचे प्रमुख आकर्षण आहे. कारच्या छतापर्यंत रेसिंग स्ट्रिप्स लावण्यात आलेत. याशिवाय फ्रंट फेंडरवर 'रेसर' बॅजिंग देण्यात आला आहे. ग्रिलमध्येही बदल करण्यात आले आहेत. केबिनमध्येही ऑरेंज ॲक्सेंटचे इंटेरियर देण्यात आले आहेत. यामुळे फक्त बाहेरुनच नाही तर कारच्या आतमध्ये देखील स्पोर्टी लुक पहायला मिळतो. 

7/7

काही महिन्यांपूर्वी  भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये या कारची पहिली झलक पहायला मिळाली.