त्या' 30 मिनिटांमुळे पाकिस्तान 14 ऑगस्टला साजरा करतो स्वातंत्र दिन

भारतात स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टला साजरा केला जातो पण आपल्या सोबतच स्वतंत्र झालेला देश 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतो असा प्रश्न अनेकांना असेलच. 

Aug 10, 2024, 12:59 PM IST
1/7

14 ऑगस्ट रोजी भारत फाळणी स्मृतीदिन साजरा करतो आणि पाकिस्तान स्वातंत्र्य दिन साजरा करतो. 1947 मध्ये दोन्ही देश वेगळे झाले, पण दोघेही वेगवेगळ्या तारखांना स्वातंत्र्य दिवस का साजरा करतात? 

2/7

स्वातंत्र्य दिन 2024 : या वर्षी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश  त्यांचा  78वा स्वातंत्र्यादिन साजरा करतील. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वातंत्र्य झाला तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला.

3/7

 स्वातंत्र्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान एकच देश होते, पण मग दोघांच्या स्वातंत्र्य तारखेत फरक कसा? शेजारी देश पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य दिन साजरा करतो ते जाणून घेऊया. 

4/7

14 ऑगस्ट आणि पाकिस्तान संबंध:  14 ऑगस्ट 1947 रोजी व्हाईसरॉय यांनी पाकिस्तानला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळवून दिला. भारतापासून वेगळे होऊन इतिहासकारांनी अनेक तर्कवितर्क दिले. काहींना असे वाटते की पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वतंत्र झाला.   

5/7

पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनाच्या तारखेबाबतही अनेक भौगोलिक कारणं सांगितली जातात.यासाठी दोन्ही देशांची प्रमाणित वेळ मानली जाते.   

6/7

पाकिस्तानची मानक वेळ आपल्या देशापेक्षा 30 मिनिटे मागे आहे. तर काही अहवालांनुसार 14 ऑगस्टच्या रात्री ब्रिटिश सरकारने भारतीय कायद्यांवर स्वाक्षरी केली त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. म्हणजेच भारतीय वेळेनुसार 15 ऑगस्ट तारीख होती पण पाकिस्तानचे घड्याळ 30 मिनिटे मागे असल्याने 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. 

7/7

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्ष पाकिस्तानने 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला होता परंतु नंतर मोहम्मद अली जिना यांचे निधन झाल्याने 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला जाऊ लागला.