गुगल मॅपला कसं कळतं कुठे आहे ट्रॅफिक जाम?

How Google Maps Work: गुगल मॅप हे एक उपयुक्त ॲप आहे. जे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात रस्ता दाखवतो आणि नेव्हिगेट करण्यास मदत करतो. हे गुगलचेच एक ॲप आहे जे आपल्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते. 

Sep 07, 2024, 15:43 PM IST
1/7

गुगल मॅप वापरण्यास विनामूल्य आहे आणि हे वापरणेही सोप्पे आहे. डेस्कटॉप आणि मोबाईल यादोन्हीवरून तुम्ही हा मॅप वापरू शकता. महत्त्वाचे म्हणजे हे अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

2/7

गुगल मॅपची मदत घेऊन तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आधीच पाहू  शकता. यासाठी तुम्हाला फक्त निघण्याचे ठिकाण आणि पोहोचण्याचे ठिकाण त्यावर टाकणे गरजेचे असते. त्यानंतर हे अॅप तुम्हाला मार्ग दाखवते. याशिवाय कोणत्या मार्गावर ट्रॅफिक जाम आहे हे सुद्धा सांगते. पण तुम्हाला माहित आहे का? हे ॲप नक्की कसे काम करते.

3/7

सॅटेलाईट फोटो आणि मॅप डेटा

गुगल मॅप जगभरातल्या सॅटेलाईटकडून मिळालेल्या फोटोंचा वापर करतो. या फोटोंमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तपशीलवार दृश्य आपल्याला  मिळते. याशिवाय इतर स्त्रोतांकडून मिळवलेला डेटाही यासाठी वापरला जातो. यामध्ये रस्ते, इमारती आणि इतरही ठिकाणांची माहिती असते.

4/7

जीपाएस (GPS)

तुम्ही तुमच्या फोनवर गुगल मॅप उघडता आणि तुमचा फोन GPS सॅटेलाईटद्वारे संकेत मिळवतो. या संकेतांच्या आधारावर तुमच्या लोकेशनची माहिती मिळते आणि मॅपवर तुमचे लोकेशन दिसते.

5/7

अल्गोरिदम आणि मशीन लर्निंग

गुगल मॅपमध्ये खुप गुंतागुंतीचे अल्गोरिदम आणि मशीन लर्निंग पाहायला मिळते. पण हे अल्गोरिदम तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी सॅटेलाईट फोटो, मॅप डेटा आणि GPS माहितीचा वापर करते. यात तुम्हाला सर्वात जलद आणि सोपा मार्ग दाखवण्यासाठी ट्रॅफिक, रस्त्याची परिस्थिती आणि इतर घटकांही विचार केला जातो.

6/7

यूजर जनरेटेड डेटा

गुगल मॅप हा आपल्या यूजरर्सचाही डेटा वापरतो. तुम्ही गुगल मॅप वापरता तेव्हा, तुमचा फोन ट्रॅफिक, रस्त्यांची स्थिती आणि इतर माहिती गुगलला पाठवतो. या माहितीमुळे गुगल मॅप जास्त अचूक बनविण्यात मदत होते.

7/7

कसे सांगतो कुठे आहे ट्रॅफिक जाम

कोणत्या मार्गावर ट्रॅफिक जाम आहे हे गुगल मॅप त्या मार्गावर धावणाऱ्या वाहनांमधील लोकांच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करून तुम्हाला सांगतो. वाहनाचा वेग आणि फोनच्या संख्येवरून काढलेली ही माहिती असते.