बीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!

BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.

Aug 09, 2023, 16:55 PM IST

Board of Control for Cricket in India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय म्हणजे भारतासाठी कुबेराची खाण. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. 

1/6

आयसीसीच्या वार्षिक महसुलातून भारतीय बोर्डाला सर्वात मोठा हिस्सा मिळत आहे. गेल्या तीन वर्षीत, BCCI तब्बल 230 दशलक्ष डॉलर कमावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 

2/6

बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात भारत सरकारला कर भरावा लागतो. बीसीसीआय क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था असल्याने बीसीसीआयला नेमका किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.

3/6

लेखी उत्तरात माहिती

बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपये आयकर भरल्याचं उघड झालं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी गेल्या पाच वर्षांतील उत्पन्न आणि खर्च यांचा तपशील दिला

4/6

आयकर रिटर्न

बीसीसीआयने भरलेला आयकर आणि भरलेल्या रिटर्नच्या आधारे त्यांनी माहिती सांगितली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात, बीसीसीआयने 844.92 कोटी रुपये आयकर भरला होता.

5/6

महसूल माहिती

मागील 2021-22 आर्थिक वर्षात बीसीसीआयला 7,606 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती समोर आली आहे, तर त्याचा खर्च 3,064 कोटी रुपयांच्या जवळपास होता. असंही पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीतून समजतंय.

6/6

आयपीएल

दरम्यान,आयसीसीच्या महसुलातून मिळणारी कमाई हा बीसीसीआयचा एक उत्तम स्रोत आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग मानली जाते. येत्या काही वर्षांत बीसीसीआय आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.