गरोदरपणात महिलांनी किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घ्या

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्यामुळे महिलांनी गरोदरपणात कॅफीनचे सेवन मर्यादित करावे. महिलांनी गरोदरपणात किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घेऊया.

| Jul 21, 2024, 19:42 PM IST
1/7

प्रतिकारशक्ती

गरोदरपणात अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच महत्त्वाच्या असतात. तर गरोदरपणात महिलांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत असते. 

2/7

चहा प्यावा की नाही?

गरोदरपणात अनेक महिलांना चहा प्यायला आवडतो. मात्र, चहा पिण्यात काही नुकसान नाही पण तो किती प्यावा हे महत्त्वाचे आहे. 

3/7

तज्ञांचे मत काय?

महिलांनी गरोदरपणात हेल्दी ड्रिंक्स प्यावे.  जर तुम्हाला दररोज चहा पिण्याची सवय असेल तर चहाचे सेवन कमी करावे

4/7

होऊ शकते नुकसान

गरोदरपणात जास्त चहा प्यायल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पोटदुखी किंवा गर्भपात होण्याचा धोका वाढतो. पण अशी प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात. 

5/7

नारळ पाणी

नारळ पाण्यात अनेक एंटीऑक्‍सीडेंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. गर्भधारणेदरम्यान, हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर गर्भातील मुलासाठीही फायदेशीर आहे.

6/7

ताक

गरोदरपणात महिला ताक पिऊ शकतात. यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात ताक शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.

7/7

फळांचा रस

गर्भधारणेदरम्यान संत्रा, डाळिंब किंवा इतर फळांचा रस पिणे देखील खूप फायदेशीर असते. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता पूर्ण होते.