नीरज चोप्राच्या दुखापतीवर मोठी अपडेट, पॅरिस ऑलिम्पिक खेळणार की नाही?

Neeraj chopra injury update : टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्राला आता पॅरिसमध्ये (paris olympics 2024) होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा एकदा सोनेरी यश संपादन करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

| Jul 21, 2024, 17:17 PM IST
1/5

नीरज चोप्राला दुखापत

काही दिवसांपूर्वी ओडिशा येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्रा याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. ऐन पॅरिस ऑलिम्पिकच्या तोंडावर नीरज दुखापग्रस्त झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.

2/5

ॲडक्टर स्नायूंना दुखापत

नीरज चोप्राच्या ॲडक्टर स्नायूंना दुखापत झाली होती, हे स्नायू मांडीच्या आतील भागात असतात. नीरजची तपासणी केली जात असून त्यानंतर रिहॅबिलिटेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

3/5

कोच क्लॉस बार्टोनिट्स

त्यामुळे नीरज चोप्रा पॅरिस ऑम्लिम्पिकमध्ये भाग घेणार की नाही? यावर सस्पेन्स निर्माण झाला होता. अशातच जर्मन कोच क्लॉस बार्टोनिट्सने एक गुड न्यूज दिली आहे.

4/5

पॅरिस ऑलिम्पिकची तयारी

नीरज चोप्रा ॲडक्टर स्नायूंना दुखापतीतून सावरत असून तो आता बरा आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज तयारी करत आहे, असं क्लॉस बार्टोनिट्सने सांगितलं आहे.

5/5

प्लॅननुसार चाललंय

दरम्यान, सर्वकाही प्लॅननुसार चाललं आहे. सध्या कोणतीही समस्या नाही. मला आशा आहे की, ऑलिम्पिकपर्यंत सर्वकाही असंच राहिल, असं देखील क्लॉस बार्टोनिट्सने म्हटलं आहे.