कोणत्या पदार्थासाठी किती लीटर पाणी लागते
प्रत्येक गोष्टीसाठी किती पाणी लागते याबाबतची अभ्यासपूर्ण माहिती या वॉटर गॅलरीतील विविध मॉडेल व चार्ट्सच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे.
अमर काणे, नागपूर : पाण्याची तीव्र टंचाई, त्यामुळे अन्नस्त्रोतांची अनुपलब्धता यासर्व बाबी समोर येतात. मुळात दुष्काळाची परिस्थीत निर्माण होण्याकरता मानवचं जबाबदार आहे. नियोजना अभावी,पाणी वापरताना निष्काळजीपणामुळे मानवाला अशा परिस्थितीला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणी वापरताना कोणती काळजी घ्यावी हे काहीसं दाखवण्याचा प्रयत्न नागपुरातील रामन विज्ञान केंद्रातील वॉटर गॅलरीच्या माध्यमातून. मानवी शरीरातील पाण्यापासून ते नद्यांच्या रचना त्या कशा वाहतात अगदी भूगर्भातील जलस्त्रोतापर्यंत इत्थंभूत माहिती या व़ॉटर गॅलरीच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.