मुंबई इंडियन्सचा जल्लोष; ओपन बसमधून मुंबईची सफर

May 14, 2019, 15:15 PM IST
1/7

मुंबई इंडियन्सने रविवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा एका रनने पराभव केला. या रोमांचक स्पर्धेत आयपीएलच्या १२ व्या सीजनचा किताब मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केला.

2/7

मुंबई इंडियन्सने हैदराबादहून मुंबईत आल्यानंतर आपल्या चाहत्यांसोबत हा आनंद साजरा केला. सोमवारी संध्याकाळी मुंबईत परतल्यानंतर ओपन बसमधून एंटिलियापासून, पेडर रोड, मरीन ड्राइव्ह या मार्गाने संपूर्ण टीम हॉटेल ट्रायडन्ट येथे पोहचली. या बसमध्ये नीता अंबानी मुलगा आकाश अंबानीसह या आनंदात सामील झाल्या होत्या.

3/7

जवळपास सहा किलोमीटरपर्यंत या ओपन बसमधून रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व खेळाडू चाहत्यांसोबत हात मिळवतानाही दिसत होते.

4/7

मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावे करण्याचा रेकॉर्ड केला आहे. २०१३, २०१५, २०१७ आणि आता २०१९ मध्येही मुंबईने आयपीएल जिंकत विक्रम केला आहे. 

5/7

आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. चेन्नईच्या शेन वॉटसनने ५९ चेंडूत ८० धावांची खेळी करत चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं होतं.

6/7

मॅच झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये यंदा विजयी झाल्याच्या आनंदासह कॅप्टन रोहित शर्माने २० मार्च २०१८ रोजी झालेल्या मॅचच्या आठवणींनाही उजाळा दिला. 

7/7

मुंबई इंडियन्स रविवारी सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं होती.