Health Tips: हिवाळ्यात हे ज्यूस पिणं आरोग्यवर्धक, फुफ्फुसं राहतील निरोगी

How To Detox Your Lungs: हिवाळ्यात श्वासासंदर्भात आजारांमध्ये वाढ होते. खासकरून फुफ्फुसं कमकुवत होतात. त्यामुळे या काळात फुफ्फुसांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काही ज्यूसचा आहारात समावेश केला पाहीजे. चला तर जाणून घेऊयात कोणता ज्यूस लाभदायी ठरेल. 

Nov 24, 2022, 15:16 PM IST
1/5

Healthy Juice

पालेभाज्यांचा ज्यूस आरोग्यवर्धक असून यामुळे फुफ्फुसं तंदुरस्त होतात. याासाठी पालक, मेथी यासारख्या भाज्यांचा ज्यूस पिणं आरोग्यसाठी लाभदायक आहे. 

2/5

Healthy Juice

बीट आणि गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यास मदत करते. यासोबतच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी देखील समृद्ध करतं. यामुळे फुफ्फुसांचे कार्य देखील चांगले होते.

3/5

Healthy Juice

सफरचंदाचा ज्यूस फुफ्फुसासाठी खूप महत्त्वाचा आहे. यात अनेक पोषकतत्त्वे असतात. व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट्स क्वेर्सेटिनचा देखील यात असतात. ही पोषक तत्व फुफ्फुसांना डिटॉक्स करण्याचे काम करते.

4/5

Healthy Juice

भोपळ्याच्या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. इंफेक्शनशी सामना आणि फुफ्फुसं मजबूत करण्यास मदत करतात. जर तुम्हाला श्वासासंबंधी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही रोज भोपळ्याचा रस पिऊ शकता.

5/5

Healthy Juice

टोमॅटोमध्ये भरपूर पोषक असतात. पोटातील जळजळ काढून टाकण्यास आणि श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. टोमॅटोच्या रसाचे सेवन केल्यास, तुम्ही फुफ्फुसांना होणारे नुकसान कमी करू शकता.