पाकिस्तानात जन्मलेली ही सौंदर्यवती Bollywood ची पहिली Glamour Girl, आघाडीच्या अभिनेत्याची आई

कलाविश्वातील काही चेहरे त्यांच्या कामातून तर काही चेहरे त्यांच्या अस्तित्वाच्याच माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकताना दिसतात. यामध्येच बॉलिवूडच्या (Bollywood) पहिल्या ग्लॅमर गर्लचाही समावेश होतो. हो, अगदी योग्य वाचलं तुम्ही. बॉलिवूडची पहिली Glamor Girl. त्यांच्या सौंदर्याची तुलना मधुबाला (Madhubala), मीना कुमारी (Meena kumari), सुरैय्या (Suraiyya) यांच्यासोबत होते. बरं, पाकिस्तानात जन्मलेल्या या अभिनेत्रीचं भारतीय कलाजगतातही तितकंच मोलाचं योगदान. ही अभिनेत्री म्हणजे 'बेगम पारा' (Begum Para). 

Nov 24, 2022, 14:07 PM IST

Bollywood News : कलाविश्वातील काही चेहरे त्यांच्या कामातून तर काही चेहरे त्यांच्या अस्तित्वाच्याच माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकताना दिसतात. यामध्येच बॉलिवूडच्या (Bollywood) पहिल्या ग्लॅमर गर्लचाही समावेश होतो. हो, अगदी योग्य वाचलं तुम्ही. बॉलिवूडची पहिली Glamor Girl. त्यांच्या सौंदर्याची तुलना मधुबाला (Madhubala), मीना कुमारी (Meena kumari), सुरैय्या (Suraiyya) यांच्यासोबत होते. बरं, पाकिस्तानात जन्मलेल्या या अभिनेत्रीचं भारतीय कलाजगतातही तितकंच मोलाचं योगदान. ही अभिनेत्री म्हणजे 'बेगम पारा' (Begum Para). 

1/5

Bollywood Glamor Girl Begum Para bold photos

(First Glamor Girl of Bollywood) बेगम पारा यांचं खरं नाव, जुबैदा उल हक. ब्रिटीशकालीन भारतामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आज तो भाग पाकिस्तानात आहे. भाऊ आणि वहिनी कलाजगताचा भाग असल्यामुळे त्यांच्याच माध्यमातून त्या चित्रपट विश्वात आल्या. 

2/5

Bollywood Glamor Girl Begum Para bold photos

वहिनीसोबत विविध कार्यक्रमांना जाणाऱ्या बेगम पारा यांच्या सौंदर्याचीच सर्वत्र चर्चा होऊ लागली. 1944 मध्ये त्यांनी 'चांद' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.   

3/5

Bollywood Glamor Girl Begum Para bold photos

1951 मध्ये त्यांनी फोटोग्राफर जेम्स बर्क यांच्यासाठी एक फोटोशूट काढलं होतं, ज्यानंतर त्यांच्या सौंदर्याचीच चर्चा चौफेर पसरली. अभिनेते दिलीप कुमार यांचे बंधू नासिर खान यांच्याशी त्यांनी निकाह केला. पण, नासिर यांच्या निधनानंतर मात्र बेगम कारा पाकिस्तानमध्ये परतल्या. तब्बल 2 वर्षांनी त्या भारतात परतल्या. 

4/5

Bollywood Glamor Girl Begum Para bold photos

भारतात परतल्यानंतर त्यांनी 'सोनी महिवाल', 'नील कमल' आणि 'लैला मजनू' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 2007 मध्ये त्यांनी 'सांवरिया' हा अखेरचा चित्रपट केला. 2008 मध्ये त्यांचं निधन झालं. 

5/5

Bollywood Glamor Girl Begum Para bold photos

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण 'दिल चाहता है' (Dil chahta hai) आणि इतरही बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता आयुब खान (Ayub khan) हा बेगम पारा यांचाच मुलगा आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारण्यात आयुबचा हातखंड आहे.