सर्वात उशीरा धावलेली ट्रेन, शेवटचं स्टेशन गाठायला लागली 3.5 वर्षं!

भारतात रेल्वे उशीराने धावणे ही काय फार मोठी गोष्ट नाही.42 तासात पोहोचणारी रेल्वे 3.5 वर्षांनी पोहोचली, या रेल्वेने केला खुपच लांबचा प्रवास

Aug 30, 2024, 16:54 PM IST

भारतात रेल्वे उशीराने धावणे ही काय फार मोठी गोष्ट नाही.42 तासात पोहोचणारी रेल्वे 3.5 वर्षांनी पोहोचली, या रेल्वेने केला खुपच लांबचा प्रवास
 

1/6

भारतात रेल्वे उशीराने धावणे ही काय फार मोठी गोष्ट नाही. पण आम्ही ज्या ट्रेनबद्दल बोलत आहोत ती शेवटच्या स्टेशनवर पोहोचायला काही तास, काही दिवस आणि काही महिने नाही तर तब्बल 3 वर्षं लागली आहेत. नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊ…

2/6

ही रेल्वे ज्या मार्गावर धावत होती, तो मार्ग खरंतर 42 तास आणि 13 मिनिटांचा आहे. मात्र 2014 ला आपल्या पहिल्या स्टेशनवरून निघालेली ही ट्रेन शेवटच्या स्टेशनवर पोहोचता-पोहोचता 2018 उजाडले.

3/6

नोव्हेंबर 2014 ला ही रेल्वे विशाखापट्टणम् येथून निघाली. शेवटचं स्थानक होतं उत्तर प्रदेशातील बस्ती. सरासरी हे अंतर गाठण्यासाठी ट्रेनला 42 तास लागायचे.

4/6

या ट्रेनमध्ये 1361 खतांच्या पिशव्या होत्या. या पिशव्या 1400 किमी दूर पोहोचवायच्या होत्या. या मालाची किंमत 14 लाखांपेक्षा अधिक होती.  

5/6

या पिशव्या रामचंद्र गुप्ता या व्यापाऱ्याच्या नावाने निघाल्या होत्या. नेहमी ४८ तासांत पोहोचणारा माल आठवडाभर आलाच नाही. त्यामुळे गुप्ता यांनी रेल्वेला अधिकृत पत्र पाठवून जाब विचारला. यानंतरही बरेच दिवस पाठपुरावा केला आणि आपला माल घेऊन येणारी रेल्वे चुकीच्या रुळावर गेल्याचं कळलं.

6/6

शोधाशोध सुरू केल्यानंतर अखेर जुलै 2018 मध्ये ही रेल्वे उत्तर प्रदेशच्या बस्ती रेल्वेस्थानकावर पोहोचली. पण, या 3 वर्षांच्या कालावधीत लाखोंची खते वाया गेली. पण, गेली तीन वर्षे ही रेल्वे कुठे होती आणि नेमकं घडलं काय? याचा अद्याप कुणाला पत्ता नाही. याच रेल्वेच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.