पावसाळ्यात सॉक्सना दुर्गंधी येते? मग करा 'हे' सोपे उपाय

Home Care Tips: ऊन्हाळ्यात घामामुळे आणि पावसाळ्यात चिखलाच्या पाण्यामुळे सॉक्सना दुर्गंधी येते. ऑफिसला जाताना किंवा मुलांच्या शाळेत सॉक्स घालणं बंधनकारक असतं. याचा सर्वात जास्त त्रास हा पावसाळ्यात जाणवतो.   

Jul 24, 2024, 16:33 PM IST
1/7

ऊन्हाळ्यात घामामुळे आणि पावसाळ्यात चिखलाच्या पाण्यामुळे सॉक्सना दुर्गंधी येते.   

2/7

थंड वातावरणामुळे धुतलेले सॉक्स लवकर सुकत नाही त्यामुळे त्यांना कुबट वास देखील येतो. अशावेळी सॉक्सचा दुर्गंधी कशी घालवावी हे समजत नाही. 

3/7

जर तुम्ही सुद्धा सॉक्सच्या दुर्गंधीला वैतागला असाल तर, काही सोप्या घरगुती टिप्सने तुम्ही सॉक्स स्वच्छ करु शकता. 

4/7

संत्र्याच्या सालीचा वापर करुन तुम्ही या सॉक्स धुतल्याने ते स्वच्छ होतात. संत्र्याची साल तासभर पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर या पाण्याने सॉक्स धुवा, असं केल्याने सॉक्सची दुर्गंधी दूर होते. 

5/7

बऱ्याचदा स्वच्छ धुवून देखील सॉक्सला घाणेरडा वास येतो, अशावेळी सॉक्स सुकल्यानंतर त्यात सुंगंधी पावडर तुम्ही टाकल्याने सॉस्कना कुबट वास येत नाही. 

6/7

सॉस्कची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही ग्रीनटी चा देखील वापर करु शकता. गरम पाण्यात ग्रीनटी मिसळा. हे काही वेळाने थंड झाल्यावर या पाण्याने सॉक्स धुवा. असं केल्याने सॉक्स चांगले धुतले जातात.   

7/7

गुलाब पाण्याचे काही थेंब सॉस्कवर शिंपडा, त्यामुळे सॉक्सना सुंगध येईल.