घरात बॉटलची झाकणं पडून आहेत, त्याचा असा करा क्रिएटिव्ह वापर

DIY Home Decor Tips in Marathi: घरात अनेकदा बाहेरुन आणलेल्या प्लास्टिकच्या बॉटलचे झाकण असेच पडून राहतात. नंतर कधीतरी वापर होईल या हेतूने ते झाकण फेकून दिले जात नाहीत. पण या झाकणांचा वापर तुम्ही घरातच करु शकता. 

| Jan 08, 2024, 12:37 PM IST
1/7

घरात बॉटलचे झाकणे पडून आहेत, त्याचा असा करा क्रिएटिव्ह वापर

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

बॉटलच्या झाकणांचा वापर तुम्ही घरातील शोभेच्या वस्तु बनवण्यासाठी करु शकता. या झाकणांपासून तुम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तु बनवू शकता. कसे ते पाहा.

2/7

वॉल हॅगिंग

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

बॉटलच्या झाकणांचा वापर तुम्ही वॉल हॅगिंगबनवू शकतात. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे झाकण घेऊन ते एका शेपमध्ये ठेवून त्यावर दोरी बांधावी लागेल. 

3/7

भिंती सजवा

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

बॉटल्या झाकणाचा वापर तुम्ही भिंत सजवण्यासाठी करु शकता. ही झाकण एकत्र जोडून तुम्ही फुल किंवा दुसरा शेप देऊन कलात्मक पद्धतीने सजवू शकता. 

4/7

दिवा बनवा

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

कोकोकोला किंवा स्प्राइटच्या बॉटलचे स्टीलच्या झाकणांचा वापर तुम्ही दिवा बनवण्यासाठी करु शकता. या झाकणांमध्ये मेण व वात ठेवून छान दिवे बनवू शकता. 

5/7

टोपली बनवा

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

बॉटलच्या झाकणांचा वापर टोपली बनवण्यासाठीदेखील करु शकता. त्यासाठी रंगीबेरंगी झाकण एकत्र करुन ती गोल पद्धतीने एकत्र जोडा. गरज वाटल्यास तुम्ही त्याला रंगही देऊ शकता. 

6/7

बॉक्स बनवा

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही एक बॉक्सदेखील बनवू शकता. दोन झाकण जोडून तुम्ही हा बॉक्स तयार करु शकता. यात पिन, बटणसारख्या वस्तू सांभाळून ठेवू शकता. 

7/7

लहान मुलांची खेळणी

how to reuse old bottle caps for decoration  diy  hacks

लहान मुलांची खेळणी तुम्ही या झाकणांपासून बनवू शकता. या झाकणांना रंग देऊन त्यावर नाक व डोळे काढून प्राण्यांचा आकार बनवू शकता.