AC चे पाणी फेकून देताय; थांबा, घरातील या कामांसाठी करा असा वापर!

घरात एसी (एअर कंडिशनर) असणं ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र एसी सुरू असताना त्यातून पाणी गळण्याचे प्रकार सतत गळत असतात. एसीतून गळत असलेले पाणी सर्रास फेकून दिले जाते. मात्र तसे न करता तुम्ही या पाण्याची बचतदेखील करु शकता. घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये तुम्ही हे पाणी वापरु शकता. 

| Aug 15, 2023, 18:06 PM IST
1/6

AC चे पाणी फेकून देताय; थांबा, घरातील या कामांसाठी करा असा वापर!

how to use ac water in your daily life check details here

एसीतून गळणारे पाणी हे पिण्यालायक नसते त्यामुळं ते फेकून दिले जाते. पण हे पाणी फेकून न देता घरातच त्याचा वापर करु शकता. कसा ते आज जाणून घेऊया. 

2/6

झाडांना पाणी घाला

how to use ac water in your daily life check details here

  एसीमधून गळणारे पाणी तुम्ही झाडांना घालू शकतात. हे पाणी तुम्ही बाटल्यांमध्ये  भरुन ठेवू शकता व या बाटल्यांमध्ये एक छिद्र पाडून त्या कुंडीत ठेवू शकता. 

3/6

हात धुण्यासाठी

how to use ac water in your daily life check details here

  जर तुमच्या घरात पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही एसीचे पाणी जपून वापरु शकता. हात धुण्यासाठी व पाय धुण्यासाठी या पाण्याचा वापर करु शकता. 

4/6

कार धुण्यासाठी

how to use ac water in your daily life check details here

एसीतून गळणाऱ्या पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या कारचे आरसे साफ करण्यासाठीदेखील वापरु शकता. तसंच, किचनमधील छोट्या-मोठ्या गोष्टी साफ करण्यासाठीही या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. 

5/6

how to use ac water in your daily life check details here

घरातील छोट्या मोठ्या गोष्टी साफ करण्यासाठी किंवा सोफ्यावरील धुळ साफ करण्यासाठी वा बाल्कनीतील लादी पुसण्यासाठीही तुम्ही या पाण्याचा वापर करु शकता. 

6/6

हे लक्षात घ्या

how to use ac water in your daily life check details here

एसीतून गळणाऱ्या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी करण्याआधी त्या पाण्याची गुणवत्ता आणि शुद्धता तपासून घ्या. त्याचबरोबर, एसीच्या बुकलेटमध्ये देण्यात आलेल्या नियमांचे पालन करा जेणेकरुन कोणतेही नुकसान होणार नाही