मोदी सरकार आणणार 75 रुपयांचं नाणं! पण तुम्हालाही ते वापरायचं असेल तर...

रविवारी, 28 मे रोजी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात 75 रुपयांचे नवीन नाणेही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संसदेच्या या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संस्मरणीय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 रुपयांचे नवीन नाणे जारी करणार आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 75 रुपयांच्या या नव्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल.

May 26, 2023, 17:06 PM IST
1/6

Special Rs 75 coin

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त भारत सरकार 75 रुपयांचे नवीन नाणे आणणार आहे. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. विशेष म्हणजे 75 रुपयांचे नाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या प्रवासाचा पुरावाही असेल.

2/6

How will the 75 rs coin

मिळालेल्या माहितीनुसार, या 75 रुपयांच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल आणि त्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आणि 5-5 टक्के निकेल आणि जस्त धातूचे मिश्रण असेल.

3/6

How the 75 rs coin  will look

75 रुपयांच्या नाण्याच्या समोरच्या बाजूला अशोक स्तंभाखाली 75 रुपये असे लिहिलेले असेल. दुसरीकडे, उजव्या आणि डाव्या बाजूला हिंदी आणि इंग्रजीमध्ये भारत लिहिले जाईल. दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र असेल आणि त्याच्या वर हिंदीत आणि खाली इंग्रजीत संसद संकुल असे लिहिलेले असेल. 

4/6

new coin

चलनी नोटा आणि नाण्यांप्रमाणे, विशेष कार्यक्रमांच्या वेळी जारी केलेल्या नोटा आणि नाणी सामान्य चलनात जारी केली जात नाहीत. मौल्यवान धातू असल्यामुळे असे करता येत नाही. तर दुसरीकडे कमी मूल्याची नाणी सहसा मर्यादित कालावधीसाठी चलनात राहतात. पण अशी नाणी सरकारी सस्थांकडून खरेदी करू शकतात.

5/6

coin Tanksal

अशी नाणी मिळवण्यासाठी, तुम्हाला विशिष्ट कालावधीत कोणत्याही भारतीय सरकारी टांकसाळीतून थेट ऑर्डर करावी लागणार आहे. याची ऑर्डर देण्यासाठी तुम्ही कोलकाता मिंट, मुंबई मिंट आणि हैदराबाद टाकंसाळीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

6/6

PM Modi inaugurate New Parliament building

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 28 मे रोजी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात विशेष पूजा आणि हवनाने होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समारोपीय भाषणाने त्याची सांगता होण्याची शक्यता आहे.कार्यक्रमाची सुरुवात वैदिक विधीनुसार विशेष पूजेने होईल. ही विशेष पूजा सुमारे दीड तास चालण्याची शक्यता आहे