बापरे! समुद्रकिनाऱ्यावर आढळला महाकाय व्हेल मासा
पश्चिम बंगालमधील (West Bengal) पूर्वी मिदनापूर जिल्ह्यातील मंदारमणिमध्ये सोमवारी सकाळी एक विशाल, महाकाय व्हेल मासा लाटांसोबत वाहत समुद्रकिनाऱ्यावर आला. व्हेल माशाबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी व्हेल माशाची तपासणी केल्यानंतर तो मृत असल्याचं समोर आलं.
या महाकाय, विशाल व्हेल माशाला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी मंदारमणि पोलीस आणि वन विभागाच्या टीमकडून पुढील कारवाई सुरु आहे.