Electric Sunroof, 6 Airbags अन्...; तुमचं SUV चं स्वप्न पूर्ण करु शकते ही Car! किंमत केवळ...

Hyundai Exter Car Specifications Price: मायक्रो एसयुव्ही सेक्टरमध्ये सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. मोजके पर्याय आणि तुफान मागणी पाहता आता ह्युंडई कंपनीने आपल्या नव्या गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी ह्युंडईची सर्वात स्वस्त एसयुव्ही असणार आहे. गाडीची किंमतही अगदी परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. जाणून घेऊयात Hyundai Exter Car बद्दल...

| May 26, 2023, 15:24 PM IST
1/13

Hyundai Exter Car Specifications and Price

भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सध्या मायक्रो एसयुव्ही सेक्शनवर सर्वच कंपन्या भर देताना दिसत आहे. सध्याच्या घडीला तरी या सेक्शनमध्ये टाटा मोटर्सची पंच आघाडीवर आहे. 

2/13

Hyundai Exter Car Specifications and Price

पंच लॉन्च होऊन दीड वर्षांचा कालावधी झाला असून या काळात दोन लाखांहून अधिक टाटा पंचचे मॉडेल्स विकले गेले आहेत. देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयुव्ही म्हणून सध्या टाटा पंचकडे पाहिलं जातं.

3/13

Hyundai Exter Car Specifications and Price

मात्र आता ह्युंडई कंपनीने या सेक्शनमध्ये आपली एक खास कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार थेट टाटा पंचला आव्हान देणार आहे. 

4/13

Hyundai Exter Car Specifications and Price

ह्युंडई कंपनीची एक्सटर ही कार लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. ह्युंडई मोटर इंडियाने 10 जुलै रोजी बाजारात दाखल होणाऱ्या आपल्या या मायक्रो एसयुव्ही कारच्या किंमतीची घोषणा केली आहे.

5/13

Hyundai Exter Car Specifications and Price

न्यू ह्युंडई एक्सटर ही कंपनीची सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरणार आहे. विशेष म्हणजे अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये ही गाडी बूक करता येणार आहे.

6/13

Hyundai Exter Car Specifications and Price

प्री-बुकिंगसाठीची टोकन रक्कम 11 हजार रुपये इतकी असल्याचं ह्युंडई कंपनीने म्हटलं आहे. म्हणजेच अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास 11 हजारांमध्ये ही कार तुम्ही बूक करु शकता.

7/13

Hyundai Exter Car Specifications and Price

ह्युंडई एक्टरमध्ये 1.2 लीटरचं नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हेच इंजिन ग्रॅण्ड आय 10 नॉइज आणि ह्युंडईच्या अन्य काही कार्समध्ये वापरलं जातं.

8/13

Hyundai Exter Car Specifications and Price

1.2 लीटरचं हे इंजिन 82 बीएचपीची सर्वाधिक पॉवर जनरेट करतं. तर 113 एनएम पॉक टॉर्क निर्माण करण्याची या इंजिनची क्षमता आहे. गाडीला इलेक्ट्रीक सनरुफही असणार आहे.

9/13

Hyundai Exter Car Specifications and Price

ह्युंडई एक्सटरमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्सबरोबरच ऑटोमॅटिक व्हर्जनचा पर्यायही देण्यात आला आहे. या गाडीचं CNG व्हर्जनही उपलब्ध होणार आहे.

10/13

Hyundai Exter Car Specifications and Price

या सेक्शनमधील ह्युंडई एक्सटर ही पहिली मायक्रो एसयुव्ही असणार आहे ज्यामध्ये 6 एअरबॅग्स देण्यात येणार आहेत. यामध्ये ईसीएस, व्हेइकल स्टेबिलीटी मॅनेजमेंट, हिल असिस्टंट कंट्रोलसारखे फिचर्स देण्यात आलेत.

11/13

Hyundai Exter Car Specifications and Price

ह्युंडई एक्सटर ही गाडी EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect या 5 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

12/13

Hyundai Exter Car Specifications and Price

ह्युंडई सर्वात स्वस्त एसयुव्ही म्हणून लॉन्च अधीच चर्चेत असलेली ही कार केवळ 6 लाख रुपयांना (एक्स शोरुम) ला उपलब्ध होणार आहे.

13/13

Hyundai Exter Car Specifications and Price

ह्युंडईची एक्सटर गाडी टाटा पंचबरोबरच सिट्रॉन सी थ्री, निसान मॅग्नाईटसारख्या गाड्यांशी स्पर्धा करणार आहे.