Photos: 'कोणताही नागपूरकर नाही म्हणू शकत नाही' अशा गोष्टीसाठी फडणवीसांचा ताफा अचानक थांबला अन्...

Deputy CM Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे रविवारी नागपूरमध्ये होते. काल सायंकाळी नागपूर शहरामधून प्रवास करताना त्यांच्या गाड्यांचा ताफा अचानक एका जागी थांबला अन् त्यानंतर तिथं नागपूरकरांची गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. फडणवीस यांनीच हे फोटो शेअर केलेत. पाहूयात फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय हे फोटो शेअर करताना...

| Jul 10, 2023, 08:38 AM IST
1/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

नागपूरकराच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या भागाला कोणी नाही कसं म्हणू शकतं? असा म्हणत फडणवीस यांनी काही खास फोटो शेअर केले आहेत.

2/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

हे फोटो आहेत फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी नागपूरमधील एका टपरीवर अचानक ताफा थांबवून केलेल्या छोट्या टी-पार्टीचे! या टी-पार्टीमध्ये नागपूरकरही सहभागी झाले.

3/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

फडणवीस यांनी शेअर केलेले फोटो हे नागपूरमधील असून त्यांच्याबरोबर अन्य काही पदाधिकारीही यावेळेस उपस्थित होते.  

4/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

फडणवीसांनी आपण या चहाचा प्रत्येक घोट एन्जॉय केल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

5/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

नागपूरमध्ये आज चहाचे घोट घेत स्थानिकांबरोबर गप्पा मारल्या. या गप्पा ही मी फार एन्जॉय केल्या असं फडणवीसांनी रविवारी (9 जुलै 2023 रोजी) शेअर केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना म्हटलं आहे.

6/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री टपरीवर चहा पिण्यासाठी थांबल्याचं पाहून या टपरीभोवती नागपूरकरांनी गर्दी केली.

7/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

बऱ्याच जणांनी फडणवीसांबरोबर गप्पा मारल्या. आपल्या तक्रारी सांगण्यापासून ते चहाबद्दलच्या गप्पा यावेळी झाल्या. 

8/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

अनेकांनी फडणवीस यांच्याकडे सेल्फीची विनंती केली. ही विनंती फडणवीस यांनी पूर्ण केली.

9/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

फडणवीस यांनी चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या वयस्कर मालकाचीही चौकशी केली. त्यांच्याबरोबरही फडणवीस यांनी गप्पा मारल्या.

10/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

हे फोटो शेअर करताना फडणवीस यांनी ही 'चाय पे चर्चा' होती असंही कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

11/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

शेवटी चहा टपरीच्या मलाकाला नमस्कार करुन फडणवीस आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

12/12

devendra fadnavis Chai Pe Charcha At Nagpur

फडणवीस हे चहाप्रेमी असल्याचा उल्लेख करत अनेकांनी त्यांच्या या साधेपणाचं कौतुक कमेंट बॉक्समध्ये केलं आहे.