Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासा

Rohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत. 

| May 15, 2024, 13:57 PM IST
1/7

रोहित शर्मा पुढचा विश्वचषक खेळू शकेल की नाही हे येणारा काळच सांगणार आहे. पण अशातच त्याने निवृत्तीवर एक मोठी गोष्ट सांगितलीये.

2/7

रोहित शर्माने एका मुलाखतीत खुलासा केलाय की, त्याला आणखी काही वर्षे खेळायचं आहे. 

3/7

रोहितच्या म्हणण्यानुसार, 17 वर्षांचा क्रिकेटचा प्रवास अप्रतिम आहे. अजून काही वर्षे खेळून मी जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यास इच्छुक आहे. क्रिकेट हे माझे प्रेम आणि व्यवसाय आहे,. 

4/7

रोहित म्हणतो, तुमच्या देशाचे कर्णधार बनणं हा तुमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. मी कधी विचारही केला नव्हता की, मी इथपर्यंत येऊन कर्णधार होईन.

5/7

लोक म्हणतात 'चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांसोबत घडतात, रोहित म्हणाला.

6/7

रोहितने एका गोष्टीवर आक्षेपही व्यक्त केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, 'ज्यावेळी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत आणि तुम्ही चांगले असता तेव्हा लोक तुमच्याकडे देवासारखे बघू लागतात  

7/7

रोहित पुढे म्हणाला, पण जर गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत तर त्यांना ते आवडत नाही.