हातोडीने काचेला तडा देऊन ग्लास पोट्रेट काढणारा अवलिया

Simon Berger Glass Portait: हातोडीने काचेला तडा देऊन ग्लास पोट्रेट काढणारा अवलिया . पेटींगमध्ये काळानुरुप अनेक बदल होत गेले. कॅनव्हासपासून ते ग्सास पेंटींगला जगात खूप मागणी आहे. या सगळ्यात ग्लास पोट्रेट साकारणाऱ्या अवलियाची सध्या सोशलमीडियावर जोरदार चर्चा आहे.   

May 16, 2024, 11:18 AM IST
1/8

घरातल्या काचेच्या वस्तू आपण खूप काळजीपूर्वक वापरतो,त्या चुकून जरी त्या फुटल्या तर वापरण्या योग्य राहत नाही. मात्र काच फोडून पोट्रेड तयार करता येतं असं म्हटलं तर ?   

2/8

स्वित्झर्लंडमध्ये राहणारा हा अवलिया चक्क काचेला तडे देऊन त्यातून सुंदर पोट्रेट उभारतो. 

3/8

सायमन बर्जर हा स्वित्झर्लंडमध्ये सुतारकाम करत असताना त्याला  काचेवर पोट्रेट काढण्याची कल्पना सुचली. 

4/8

काचेवर हातोडीने घाव देत त्याला जाणाऱ्या तड्यांमधून पोट्रेट साकारणाऱ्या सायमनचे पोट्रेट सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत.   

5/8

तुमच्यात असलेले कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळण्याकरीता त्यात सातत्य टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं.   

6/8

सायमनने त्याच्या सर्जनशीलतेला सत्यात उतरवण्यासाठी कायम सातत्य ठेवलं.   

7/8

आज त्याच्या काचेवरच्या पोट्रेटचं प्रदर्शन पाहणं हे कलाप्रेमींसाठी कायमच पर्वणी ठरते.  

8/8

तुमच्यातली कला तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सायमन बर्जर. ग्लास पोट्रेट जगभरात प्रसिद्ध होण्यात सायमनचा मोलाचा वाटा आहे.