IAS सोनिया मीना या अधिकाऱ्याची संघर्ष कथा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना दिला हा सल्ला

IAS Sonia Meena: सोनिया मीना यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला असून 2013 बॅचमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सेवेत रुजू झाल्या. याआधी त्यांनी उमरियाचे एडीएम आणि जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हे पद भूषवले होते. सोनिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत.

Dec 07, 2022, 15:57 PM IST
1/6

IAS sonia meena

आएएस सोनिया मीना यांनी 2013 मध्ये 36 वा क्रमांक मिळवला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना त्यांनी सल्ला दिला आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहीजे. परिश्रमासोबतच परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांसाठी तुमचा वेग खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक टप्प्यानुसार रणनीतीही वेगळी असावी. 

2/6

IAS sonia meena

यूपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर सोनिया मीना यांना मध्य प्रदेश केडर मिळाले. सोनिया मीना एसडीएम असताना त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती, पण खाण माफियांविरुद्धची त्यांची कारवाई तशीच ठेवली. 

3/6

IAS sonia meena

परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, कठोर परिश्रम करावे लागतात आणि कठोर परिश्रमाला पर्याय नाही. म्हणून जेवढे कष्ट करता येतील तेवढे करा, असे सोनिया मीना यांचं मत आहे. 

4/6

IAS sonia meena

तुमच्या मनात एकच गोष्ट असली पाहिजे की तुम्हाला या देशाची सेवा करायची आहे. त्यासाठी वचनबद्धता असली पाहिजे.  

5/6

IAS sonia meena

नागरी सेवेचा अभ्यासक्रम मोठा आहे. यासाठी योग्य वेळापत्रक आखलं पाहीजे. वेळापत्रकानुसार अभ्यास केला पाहीजे.

6/6

IAS sonia meena

मार्च 2021 मध्ये सोनिया मीना यांची केरळ विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तेव्हा त्यांचे वडील केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी होते.सोनिया मीनाचे इंस्टाग्रामवर 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.