10 दिवस, 14 सामने! सर्वाधिक धावा, विकेट कोणाच्या नावावर... वाचा एका क्लिकवर

ICC ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता रंगतदार आणि चुरशीची होत चालली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास प्रत्येक संघाचे तीन सामने झाले असून प्रत्येक सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्ये (WC Pointtable) मोठा उलटफेर पाहिला मिळतोय. यजमान भारत (India) सध्या तीन विजयासह पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, न्यूझीलंड संघ (New Zealand) तीन विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानने पराभवाची धुळ चारली आणि या स्पर्धेतला पहिला सर्वात मोठा उलटफेर ठरला. आणखी बरेच सामने बाकी आहेत आणि क्रिकेट चाहत्यांना अशा अनेक चुरशीच्या लढती पाहिला मिळणार आहेत. 

| Oct 16, 2023, 19:09 PM IST
1/9

दहा दिवसातली कामगिरी

भारतात पाच ऑक्टोबरला सुरु झालेल्या विश्वचषक स्पर्धेला आता दहा दिवस झाले आहेत. या दहा दिवसात 14 सामने खेळवले गेले असून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट कोणाच्या नावावर आहेत याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. 

2/9

सर्वाधिक धावा

पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानच्या नावावर सर्वाधिक धावा जमा आहेत. रिझवानने तीन सामन्यात 248 धावा केल्यात. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे 229 धावा, तर टीम इंडियाचा कर्णधार 217 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

3/9

सर्वाधिक विकेट

सर्वाधिक विकेटच्या यादीत भारताचा जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. बुमराहने 3 सामन्यात आठ विकेट घेतल्यात. न्यूझीलंडचा मिचेल सेंटनर आणि मॅट हेनरीच्या नावावरही आठ विकेट आहेत.

4/9

सर्वोत्त्कृष्ट खेळी

न्यूझीलंडच्या डेवोन कॉनवे इंग्लंडविरुद्ध  147 चेंडूत 152 धावांची केलेली केळी विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्तम खेळी आहे. 

5/9

सर्वोत्कृष्ट ॲव्हरेज

न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेल याने 3 सामन्यातील दोन इनिंगमध्ये 137 धावा केल्या आहेत. त्याचा ॲव्हरेज 137 इतका आहे. 

6/9

सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट

श्रीलंकेचा फलंदाज कुसाल मेंडिसने आतार्यंत 119 चेंडूत 198 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 166.38 इतका आहे. 

7/9

सर्वाधिक षटकार

विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेचा कुसाल मेंडिसने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याच्या नावावर 14 षटकार जमा झालेत.

8/9

सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

न्यूझीलंडचा गोलंदाज मिचेल सेंटनरने नेदरलँडविरोधात 10 षटकात 59 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. वर्ल्डकपमधली ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली आहे. 

9/9

सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेट

भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने 10 षटकात केवळ 34 धावा दिल्या होता. त्याचा इकोनॉमी रेट फक्त 3.4 पर ओव्हर आहे.