'या' 5 खेळाडूंचं कसोटीतील भवितव्य धोक्यात? इंग्लंड दौऱ्यादरम्यान होऊ शकतो फैसला

मुंबई: जून महिन्यात 18 ते 22 दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळतील. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. इंग्लंड दौऱ्यादरम्यान 5 खेळाडूंचं कसोटी सामन्यातील भवितव्य ह्या दौऱ्यावर अवलंबून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 13, 2021, 11:37 AM IST
1/5

केएल राहुल

केएल राहुल

ऑगस्ट 2019 पासून के एल राहुल एकाही कसोटी सामन्यात खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या 2 कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.  सध्या के एल राहुलची कसोटी फॉरमॅटमधील जागा सध्या धोक्यात आहे. त्याला आपली चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये के एल राहुल चांगल्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे.   

2/5

मयंक अग्रवाल

मयंक अग्रवाल

मयंक अग्रवाल आतापर्यंत 5 टेस्ट सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 597 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान त्याची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर त्याला आपली कामगिरी दाखवणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

3/5

हनुमा विहारी

हनुमा विहारी

हनुमान विहारीला टीम इंडियामध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. सिडनी टेस्ट सामन्यात त्याने नाबाद राहून मॅच ट्रॉ करण्यासाठी मदत केली होती. आता इंग्लंड दौऱ्यावर त्याला पुन्हा आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे.   

4/5

ऋद्धिमान साहा

ऋद्धिमान साहा

ऋद्धिमान साहाला ऋषभ पंत स्पर्धक आहे. मागच्या 2 सामन्यांमध्ये ऋषभ पंतचा जबरदस्त फॉरमॅट पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता ऋद्धिमानला देखील आपली कामगिरी उत्तम दाखवावी लागेल.

5/5

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकुर

शार्दुल ठाकूर 2 कसोटी खेळला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. ज्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र जास्त धावा दिल्याने टीकाही झाली होती. त्यामुळे यावेळी त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.