Idli ideas: कुल्फी इडली खाल्लेय ? इडली पात्रात नाही...या हटके स्टाईलने बनवून पाहा इडली

idali : लुसलुशीत इडली सर्वांचाच आवडीचा विषय आहे. वाफाळत्या इडलीवर सांबारआणि चटणी घालून ताव मारणं म्हणजे अहाहा ! पण तुम्ही कधी कुल्फी इडली खाल्लेय का ? 

Jan 30, 2023, 10:56 AM IST

इडली (idli) हा दक्षिण भारतात बनला जाणारा मुख्य पदार्थ, पण संपूर्ण भारतात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. इडली (healthy idli) हा पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिकसुद्धा असतो. कारण इडली बनवताना तेलाचा वापर होत नाही. कुठलेही मसाले वापरले जात नाहीत. आपल्याला घरी पात्रात बनणारी इडली आपल्याला माहित आहेच. पण इडली बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत चला जाणून घेऊया. (idli making ideas)

1/5

कुल्फी इडली - सध्या सकाळचा हेल्दी नाश्ता म्हणून इडली खाल्ली जाते. कुल्फी इडली सध्या खूप फेमस आहे. पोपसिकल्स बनवण्याच्या मोल्डमध्ये तुम्ही इडली बॅटर घालायचं आहे, त्यांना स्टीम करा कुल्फी इडली तयार.

2/5

कोकोनट शेल इडली- नारळाची करवंटी स्वच्छ धुवून घ्या, त्यात इडली बॅटर घाला आणि स्टीम करून घ्या. कोकोनट शेल इडली तयार.

3/5

वाटी इडली- तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर ही उत्तम आयडिया आहे, एका भांड्यात पाणी घ्या त्यावर एक ताट ठेवा त्यात इडली बॅटर भरून छोट्या वाट्या ठेवा. त्यावर झाकण मारून वाफ काढून घ्या. वाटी इडली तयार. 

4/5

अप्पे इडली- अप्पे बनवण्याच्या पात्रात इडली बॅटर घाला आणि ते स्टीम करा.अप्पे इडली तयार. 

5/5

पॅन केक इडली - तव्यावर पॅन केकच्या आकारात इडली (idli) बॅटर ओता, यावेळी फक्त बॅटर जरा जाडसर घाला. पॅन केक इडली तयार.