वन नेशन, वन इलेक्शन झाल्यास निवडणुकांवर होणारा करोडो रुपयांचा खर्च खरचं वाचेल का?

केंद्र सरकारच्या वतीनं लवकरच वन नेशन, वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. 

Aug 31, 2023, 23:41 PM IST

one nation one election : वन नेशन, वन इलेक्शन विधेयक आणण्याची तयारी केंद्रातील मोदी सरकारनं सुरू केली आहे. याचाच अर्थ देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या आहेत. 

 

1/10

केवळ 4 पक्षांनी पाठिंबा दर्शवला, तर 9 पक्षांनी त्याला विरोध केला होता. 

2/10

भाजप आणि काँग्रेसनं त्यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. 

3/10

जुलै 2018 मध्ये विधी आयोगानं एकत्रित निवडणुका घेण्याबाबत राजकीय पक्षांची बैठक घेतली होती.  

4/10

एकत्रित निवडणुका झाल्यास खर्च कमी होऊ शकतो, असं विधी आयोग आणि नीती आयोगाच्या अहवालातही नमूद करण्यात आलंय.

5/10

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भूमिकेला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाठिंबा दिला होता. 

6/10

निवडणुकांवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात, असा भाजपचा प्रस्ताव आहे.

7/10

आगामी लोकसभा निवडणुकीत हाच खर्च 5 हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. 

8/10

 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी हाच खर्चाचा आकडा तब्बल 3,870 कोटी रुपयांवर पोहोचला

9/10

1952 मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी 10.52 कोटी रुपये खर्च झाले.

10/10

आतापर्यंत 1951-52, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा-विधानसभेच्या एकत्रित निवडणुका झाल्या आहेत.