ICC ODI World Cup 2023 : ' म्हणून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही', खळबळजनक भविष्यवाणी करत युवराज सिंग ने ठेवलं वर्मावर बोट!

Yuvraj Singh on Team India: टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह याने मोठं वक्तव्य केलंय.

Jul 11, 2023, 22:31 PM IST

ICC ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे. यंदाचं यजमानपद टीम इंडियाकडे असल्याने आता भारत यंदा वर्ल्ड कप जिंकणार, असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) 2013 मध्ये जिंकली होती. त्यानंतर संघाला कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर आणि 2011 चा वर्ल्ड कप विजेता युवराज सिंह (Yuvraj Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

1/5

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही!

भारतीय क्रिकेट संघाच्या गेल्या दहा वर्षांतील चढउतार कामगिरीबद्दल विचारले असता युवराज सिंहने स्पष्ट आपलं मत मांडलं. मला खात्री नाही की टीम इंडिया विश्वचषक जिंकेल की नाही, मी देशभक्त म्हणून म्हणू शकतो की भारत जिंकेल, असंही युवराज सिंह म्हणाला आहे.

2/5

निराशाजनक

भारतीय संघाच्या मधल्या फळीत दुखापतींबाबत खूप चिंता असल्याचे मला दिसत आहे. भारताने विश्वचषक जिंकला नाही हे निराशाजनक आहे, पण तेच सत्य आहे, असं युवराज सिंहने सांगितलं आहे.

3/5

मिडल ऑर्डर

टीम इंडियाची टॉप ऑर्डर ठीक आहे पण मधल्या फळीला व्यवस्थित करण्याची गरज आहे. स्लॉट 4 आणि 5 खूप महत्वाचे आहेत, असं युवराज म्हणतो.

4/5

ऋषभ पंत

ऋषभ पंत आयपीएल फ्रँचायझीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल तर त्याने टीम इंडियासाठीही चौथ्या क्रमांकावर यायला हवं, असं मत त्याने मांडलंय.

5/5

भारत प्रायोगिक मोडमध्ये

नॉक आऊट सामन्यांसारखे दडपण सामने खेळताना भारत प्रायोगिक मोडमध्ये राहू शकत नाही, असं म्हणत युवराजने मॅनेजमेंटला सल्ले दिले आहेत. केएल राहुल किंवा रिंकू सिंह हे खेळाडू नंबर चारची जागा चालवू शकतात, असंही सिक्सर किंग म्हणतो.