१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

'या' १० बदलांसाठी सज्ज व्हा 

| Dec 25, 2020, 11:45 AM IST

मुंबई : अवघ्या पाच दिवसांनी आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. हे नवे वर्ष सगळ्याच बाबतीत खास आहे. कोरोनावर मात करत आपण नवीन वर्षाचा आनंद लुटणार आहे. यासोबतच नवीन वर्षात आपल्या जीवनावर थेट परिणाम करणारे महत्वाचे १० बदल होणार आहेत. 

१ जानेवारीपासून होणारे हे १० बदल अनेक क्षेत्रांशी जोडले गेलेले आहेत. चेक पेमेंट (Cheque Payment) ते फास्ट टॅग (Fast Tag) आणि यूपीआय (UPI) पेमेंटशी संबंधीत नियमांमध्ये महत्वाचे बदल होणार आहे. यासोबतच जीएसटी (GST) रिटर्नच्या नियमातही बदल होणार आहेत. हे बदल १ जानेवारीपासून लागू होणार आहेत. 

1/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

चेक पेमेंटमध्ये सर्वात मोठा बदल - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) १ जानेवारी २०२१ पासून चेकच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Positive Pay system) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने हा निर्णय चेक पेमेंटमधील फ्रॉड रोखण्यासाठी घेतला आहे. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर 50,000 आणि त्यापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली लागू होईल. यामध्ये चेक जारी करणाऱ्याच्या माहितीची दुसऱ्यांदा पुष्टी केली जाईल. चेक देणाऱ्याला चेक नंबर, चेक डेट, कुणाला पेमेंट केलं आहे त्याचा खाते क्रमांक, रक्कम इ. माहिती द्यावी लागेल.  

2/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI)कॉन्टॅक्टलेस कार्ड्स वापरून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवली आहे. ही मर्यादा २ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. आता डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून ५ हजारांपर्यंत पेमेंट करण्यासाठी पिन नंबरची गरज लागणार नाही.

3/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

चार चाकी वाहन्यांसाठी फास्टटॅग (Fast Tag)सरकारने अनिवार्य केलं आहे. फास्टटॅग नसलेल्या वाहनांनी नॅशनल हायवेवरून प्रवास केल्यास त्यांना डबल चार्ज लागणार आहे. सर्व टोल प्लाझावर ८०% रांगेला फास्टटॅग आणि २०% रांगेला रोख रक्कमे करता वापरण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 (Central Motor Vehicles Rules, 1989) मध्ये बदल करण्यात आले आहेत. 

4/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी १ जानेवारी २०२१ आपल्या अनेक मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे कारच्या किंमतीत वाढ होणार आहे. आतापर्यंत मारूती, महिंद्रानंतर रेनॉ आणि एमजी मोटारने किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 

5/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

सेबी (SEBI) ने मल्टीकॅप म्युचअल फंडांच्या एसेट अलोकेशनच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, आता फंड्सच्या ७५% भाग इक्विटीमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ६५% भाग समाविष्ट होता. 

6/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

लँडलाइन वरुन मोबाइलवर कॉल करण्याआधी जोडावा लागेल शून्य- डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्स (Department of Telecommunications - DoT) ने लँडलाइन वरुन मोबाइलवर कॉल करण्याआधी 0 (शून्य) जोडणे अनिवार्य केलं आहे. हा नियम 15 जानेवारी 2021 पासून लागू होईल. यासाठी टेलिकॉम डिपार्टमेंटने नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्यास सांगितले आहे.

7/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीनंतर लोकं कमी प्रीमियममध्ये विमा पॉलिसी खरेदी करू शकतात. इन्श्युरन्स रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटी (IRDAI) मध्ये सर्व कंपन्यांना जीवन विमा लाँच करण्याचे आदेश दिले आहेत. ही एक स्टँडर्ड टर्म लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी असणार आहे.  

8/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

UPI च्या माध्यमातून पेमेंट करणं महागणार आहे. थर्डपार्टीकडून चालवण्यात येणाऱ्या apps वर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने याबाबत निर्णय घेतला आहे.

9/9

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

१ जानेवारीपासून बदलणार 'हे' १० नियम, थेट तुमच्यावर करणार परिणाम

काही प्लॅटफॉर्मसवर WhatsApp सपोर्ट करणं बंद होणार आहे. WhatsApp पेज ने अशी माहिती दिली आहे की, व्हॉट्सॲपने (Whatsapp) जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲप (Whatsapp) सुविधा मिळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) पासून सुरू होणाऱ्या OS वरच व्हॉट्सॲप (Whatsapp) चालू शकणार आहे.