स्वस्त सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी

सरकारची नवी योजना  

Dec 25, 2020, 11:38 AM IST

सध्या बाजारात सोन्याचे भाव अस्थिर आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. रिजर्व बँकने (RBI) ग्राहकांना स्वस्त दरांत सोनं खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देली आहे. लवकर सॉवरेन गोल्ड बॉन्डची (Sovereign Gold Bond) ९वी सीरिज सुरू होणार आहे. 

 

1/6

सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना २०२०-२१ ची नववी मालिका २८ डिसेंबर २०२० पासून सब्सक्रिप्शनसाठी सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये १ जानेवारी २०२१ पर्यंत गुंतवणूक करता येवू शकते. यावेळी रिझर्व्ह बँकेने प्रति ग्रॅम इश्यूची किंमत ५ हजार रुपये निश्चित केली आहे.  

2/6

जर तुम्ही डिजिटल माध्यमातून व्यवहार करत असाल तर तुम्हाला प्रति ग्रॅम ५० रूपयांची सूट मिळेल.   

3/6

ज्या गुंतवणूकदारांनी २०१५ साली नोव्हेंबर महिन्यात सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या पहिल्या इश्यूत सब्सक्राइब केलं होतं, त्या ग्राहकांना पाच वर्षात जवळपास ९३ टक्के रिटर्न मिळालं आहे.   

4/6

सॉवरेन गोल्ड बॉन्डचा कालावधी ८ वर्षांचा असतो पण गुतवणूकदार ५ वर्षांमध्ये या योजनेतून बाहेर येवू शकतात.   

5/6

जर तुम्हाला सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुमच्या कडे PAN असणं गरजेच आहे. यासाठी तुम्ही डाकघर, स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) किंवा एजेंन्टकडे अर्ज करू शकता.   

6/6

या योजने अंतर्गत आर्थिक वर्षात तुम्ही ४ किलो सोनं विकत घेऊ शकता. सरकार तुम्हाला सोन्याच्या बाँडमध्ये अडीच टक्के व्याजही देते. म्हणजेच सोन्याच्या वाढत्या किंमती व्यतिरिक्त आपल्याला व्याज देखील मिळते.