महाभारतात श्रीकृष्णाने का नाही केले अभिमन्यूचे रक्षण?

महाभारतात सर्वात शूर योद्धांमध्ये  अभिमन्यूदेखील आहे. चक्रव्यूहात प्रवेश करण्याचे ज्ञान अभिमन्यूला जन्मत:च मिळाले होते पण त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग माहित नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला .अभिमन्यूच्या मृत्यूचे एक विशेष कारण होते त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी देखील त्याचे प्राण वाचवले नाही.   

Aug 07, 2024, 13:36 PM IST
1/7

महाभारत हे युद्ध धर्मासाठी झाले असे म्हटले जाते. प्रत्येक युगात भगवान विष्णू अवतार घेतात. भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून इतर देवांनीही वेगवेगळ्या ठिकाणी  जन्म घेतला जेणेकरून भगवान श्रीकृष्णाला धर्म स्थापन करण्यासाठी मदत  करू शकतील.   

2/7

अभिमन्यू हा एक महान योद्धा आहे. या योद्ध्याने एकट्याने महाभारतात सर्व योद्ध्यांना संपूर्ण दिवस रोखून ठेवले होते. या युद्धामध्ये अभिमन्यूचा मृत्यू झाला. 

3/7

भगवान श्रीकृष्ण हे सर्व पाहत उभे होते पण हे सर्व एका उद्देशाच्या पूर्ततेसाठी करण्यात आले होते. धर्म रक्षणासाठी जेव्हा देवांनी जमिनीवर अवतार घेतला तेव्हा चंद्राचा पुत्र वर्चा हा अभिमन्यूचा रूपात जन्माला आला.

4/7

त्यावेळी चंद्र देवांना म्हणाला की, मी माझ्या प्रिय पुत्राला माझा प्राण देऊ शकत नाही.म्हणून वर्च हा मनूष्य बनेल परंतू तो फार काळ राहणार नाही , तो इंद्राचा अवतार असेल,जो भगवान श्रीकृष्णाशी म्हणजेच अर्जुनशी मैत्री करेल, माझा मुलगा अर्जुनाचाच पुत्र असेल.

5/7

माता चंद्राने त्यावेळी आपला पुत्र वर्चासाठी देवांसमोर एक अट ठेवली की भगवान श्रीकृष्णांसमोर वर्चा चक्रव्यूहात प्रवेश करेल, भयकर युद्ध करून तो सर्वांना आश्चर्यचकितही करेल पण संध्याकाळी संपूर्ण दिवस लढल्यानंतर तो मरेल आणि पुन्हा माझ्याकडे येईल. यामुळेच अभिमन्यूने मरण पत्कारले. 

6/7

यानंतर चंद्राच्या या अवस्थेमुळे सर्व देव हतबल झाले आणि नंतक चंद्राचा मुलगा वर्चा हा महारथी अभिमन्यू म्हणून जन्माला आला.   

7/7

महाभारताच्या चक्रव्यूहात आपले शौर्य दाखवून त्याने हौतात्म्य मिळवले म्हणूनच श्रीकृष्णाने अभिमन्यूचे प्राण वाचवले नाही.