Rahul Dravid: रोहितच्या स्तुतीत मी काय...; वर्ल्डकप हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माबाबत काय म्हणाले द्रविड?

Rahul Dravid: नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी रोहित बाबत मोठं विधान केलं आहे. 

| Nov 20, 2023, 09:08 AM IST
1/7

फायनल सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड म्हणाले की, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप 2023 मध्ये सलग 10 विजय मिळवले. 

2/7

द्रविड म्हणाले, मला वाटतं की, त्याने मुलांमध्ये खूप वेळ आणि शक्ती दिली. आमच्या कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी तो नेहमी उपलब्ध असायचा.

3/7

कोच द्रविड यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. त्याची फलंदाजीही उत्कृष्ट होती. त्याने आमच्यासाठी टोन सेट केला, असंही द्रविड म्हणाले.

4/7

त्याला इतर खेळाडूंसाठी स्वतःचं उदाहरण सेट करायचं होतं आणि त्याने तसं केलं. रोहितच्या स्तुतीत मी आणखी काय बोलू??, असं द्रविड बोलताना म्हणाले.

5/7

त्याला इतर खेळाडूंसाठी स्वतःचं उदाहरण सेट करायचं होतं आणि त्याने तसं केलं. रोहितच्या स्तुतीत मी आणखी काय बोलू??, असं द्रविड बोलताना म्हणाले.

6/7

रोहितने संपूर्ण वर्ल्डकपच्या स्पर्धेत 11 सामन्यात 597 रन्स केले. त्याची फलंदाजीची सरासरी 54.27 आणि स्ट्राईक रेट 125.94 होता.

7/7

वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचे डोळे मात्र पाणावले होते.