राज्यात शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश; पहिली ते बारावी पर्यंतच्या वर्गात समावेश
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार. पहिली ते बारावीपर्यंत शेतीविषयक धडे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची झी २४ तासला एक्सक्लुसिव्ह माहिती.
Maharashtra Education : राज्यात शालेय शिक्षणात आता कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. पहिली ते १२ वी पर्यंत हा विषय शिकवण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. शेतीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी हे धोरण राबवण्यात येणार आहे.