Children's Height: लहान मुलांची उंची वाढत नसेल तर 'या' पदार्थांचा समावेश करा, फरक दिसून येईल

Foods To Increase Height: मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. कमी उंचीमुळे मुलांच्या मनात आत्मविश्वासाची कमी निर्माण होऊ शकते. परंतु, काळजी करण्याची गरज नाही. चांगले आहार मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकते.

Jan 16, 2023, 16:52 PM IST
1/5

दूध

मुलांना A2 गायीचे तूप आणि दूध द्यायला हवे. याबरोबरच थंडीच्या दिवसांत मुलांना आवर्जून खडीसारख द्यायला हवी. तसेच साध्या दुधाशिवाय बदाम, हळद किंवा केशरचे दूधही मुलांना दिले पाहिजे. 

2/5

अंडी

अंडी खाल्ल्याने शरीराला प्रथिने, बायोटिन, रिबोफ्लेविन आणि लोहही मिळते. ज्या मुलांच्या आहारात प्रथिने भरपूर असतात. त्यांच्या शारीरिक विकासात खूप मदत होते. तसेच सकाळच्या नाश्त्यात दररोज एक अंड मुलाला द्या. किंवा ऑम्लेट, उकडलेले अंडही देऊ शकतात. 

3/5

सोयाबीन

सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सोयबीन दिले जाते. तुम्ही सोयाबीनपासून वेगवेगळे पदार्थ तयार करून मुलांना देऊ शकता. टोफू देखील वापरता येते आणि सोया चंक्स देखील.

4/5

गाजर

लहान मुलांना गाजरातून भरपूर जीवनसत्त्वे मिळतात. यामुळे हाडे वाढण्यास आणि निरोगी राहण्यास मदत होते. मुलांना रोज कच्चे गाजर खाऊ घालू शकता. मुलांना गाजराची भाजी, रस किंवा कोशिंबीर देऊ शकता. 

5/5

दही

दही प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. याचा शरीराच्या वाढीवर आणि विकासावर चांगला परिणाम होतो. जर मुलांना दही खायचे नसेल तर त्यांना प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर असलेले चीजही खायला दिले जाऊ शकता..