IND vs BAN: 'या' 5 खेळाडूंच्या जीवावर टीम इंडियाने बांगलादेशवर मिळवला विजय

IND vs BAN T20 World Cup 2022: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने 3 विकेट्सह बांगलादेशाचा पराभव करत स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला. दरम्यान आजच्या सामना टीम इंडियाने 5 खेळाडूंच्या बळावर जिंकला. पाहूयात हे खेळाडू कोण?

Nov 02, 2022, 22:44 PM IST
1/5

विराट कोहली

IND vs BAN Team India beat Bangladesh on the 5 players

बांगलादेशावर विजय मिळवण्यासाठी खरा हिरो ठरला तो विराट कोहली (Virat Kohli). विराटने या सामन्यात 44 बॉल्समध्ये 64 रन्सची खेळी केली. यामध्ये 8 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे.

2/5

केएल राहुल

IND vs BAN Team India beat Bangladesh on the 5 players

सतत खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) ची बॅट अखेर आज तळपली. केएलने आजच्या सामन्यात 32 बॉल्समध्ये 50 रन्स केलेत. राहुलने हे रन 156.25 च्या स्टाईक रेटने मारलेत.

3/5

अर्शदीप सिंग

IND vs BAN Team India beat Bangladesh on the 5 players

टीम इंडियाचा तरूण वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्या गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकलीयेत. अर्शदीप सिंगने 4 ओव्हरमध्ये 38 रन्स देत 2 विकेट्स घेतले.

4/5

हार्दिक पांड्या

IND vs BAN Team India beat Bangladesh on the 5 players

हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात फलंदाजीत चांगला खेळ करू शकला नाही. मात्र त्याने गोलंदाजी करत बांगलादेशच्या टीमला दणका दिला. हार्दिक पांड्याने 3 ओव्हरमध्ये 28 रन्स देत 2 विकेट्स घेतले.

5/5

मोहम्मद शमी

IND vs BAN Team India beat Bangladesh on the 5 players

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीनेही अप्रतिम गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने 8.33 च्या इकॉनॉमीने 3 ओव्हरमध्ये 25 रन्स देत 1 विकेट घेतली. मोहम्मद शमीने सलामीवीर नजमुल हुसेनची विकेट घेतली.