Pravaig Electric SUV: अवघ्या 30 मिनिटात होते 80 टक्के चार्ज, 504 किमी रेंज देण्याऱ्या गाडीचे फीचर्स जाणून घ्या

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांचं युग आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी भविष्यातील गरज ओळखून इलेक्ट्रिक गाड्यांकडे मोर्चा वळवला आहे. आता भारतात आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार 25 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. या गाडीची रेंज 504 किमी आहे. 

Nov 02, 2022, 21:57 PM IST

Pravaig electric SUV: सध्या इलेक्ट्रिक गाड्यांचं युग आहे. जवळपास सर्वच कंपन्यांनी भविष्यातील गरज ओळखून इलेक्ट्रिक गाड्यांकडे मोर्चा वळवला आहे. आता भारतात आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार 25 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. या गाडीची रेंज 504 किमी आहे. 

1/5

Pravaig electric SUV Car, Auto News, Pravaig electric Range, Pravaig electric battery Life

कार सायलेंट केबिनचा अनुभव देते. एसयूव्हीमध्ये सिल्क स्मूथ सस्पेंशन, मल्टीव्हीएसी हाय परफॉर्मन्स सर्व्हर आणि सेन्सर्स, व्हॅनिटी मिरर, ऑनबोर्ड अल्ट्राफास्ट वाय-फाय, पीएम 2.5 एअर फिल्ट्रेशन आणि मोठा लेगरूम मिळतो.  

2/5

Pravaig electric SUV Car, Auto News, Pravaig electric Range, Pravaig electric battery Life

या गाडीतील स्पेस पाहता कारमध्ये लॅपटॉप आरामात वापरू शकता. यासाठी 15 इंची फोल्डिंग डेस्क बसवण्यात आला आहे. 220V पॉवर आउटलेट देखील दिला आहे.

3/5

Pravaig electric SUV Car, Auto News, Pravaig electric Range, Pravaig electric battery Life

या गाडीची बॅटरी लाइफ जबरदस्त आहे. 10 लाख किमीपर्यंत क्षमता आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. कारमध्ये 70kWh ते 3.5MWh क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी फक्त 30 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज होते. 

4/5

Pravaig electric SUV Car, Auto News, Pravaig electric Range, Pravaig electric battery Life

या कारचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा का गाडीला चावी मारली की अवघ्या 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. कारचा टॉप स्पीड 200 किमी प्रतितास आहे.

5/5

Pravaig electric SUV Car, Auto News, Pravaig electric Range, Pravaig electric battery Life

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या गाडीत फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये अनेक सेफ्टी फीचर्स समावेश आहे. Pravaig च्या अधिकृत वेबसाइटनुसार, या कारला सुरक्षितेतच्या दृष्टीने 5-स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.